सोमवारी दहावीचा निकाल; राज्य मंडळाची अधिकृत घोषणा

Author Picture
By Umesh Gore Writer
Published On: May 26, 2024
सोमवारी दहावीचा निकाल; राज्य मंडळाची अधिकृत घोषणा
— SSC Board Result 2024

इयत्ता 10वी परीक्षेचा निकाल सोमवारी म्हणजेच 27 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन जाहीर केला जाईल.

SSC Board Result 2024

SSC Board Result 2024 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 10वी परीक्षेचा निकाल (SSC बोर्ड निकाल) सोमवार, 27 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन जाहीर करेल. यासंदर्भात राज्य मंडळाने अधिकृत परिपत्रक जारी केले आहे. अशा स्थितीत निकालाबाबत विद्यार्थ्यांची उत्सुकता आता संपणार आहे. खाली दिलेल्या लिंकवर जाऊन विद्यार्थी निकाल पाहू शकतात.

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी 27 मे पर्यंत निकाल जाहीर केला जाईल, असे जाहीर केले होते. त्यानुसार राज्य मंडळाने 27 मे रोजी निकाल जाहीर करण्याबाबत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. यंदा प्रथमच मे महिन्यातच दहावीचा निकाल जाहीर होत आहे. यापूर्वी जूनच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर करण्याची परंपरा होती, मात्र विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यांकनाचे गुण ऑनलाइन मागविण्यात येत असल्याने निकाल आधी जाहीर करणे शक्य होते.

अधिकृत वेबसाइटचे पत्ते खालीलप्रमाणे आहेत.

  1. https://mahresult.nic.in
  2. http://scresult.mkcl.org
  3. https://sscresult.mahahsscboard.in
  4. https://results.digilocker.gov.in
  5. https://results.targetpublications.org
  6. https://www.tv9marthi.com

बारावी पास नंतर ‘हे’ टॉप करिअर पर्याय…

Umesh Gore
Writer

उमेश गोरे हे Goresarkar.in चे संस्थापक, लेखक आणि संपादक आहेत. ते केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या विविध सरकारी योजना, शेतीविषयक योजना, कृषी धोरणे, शेतकरी कल्याण, शिक्षण, शिष्यवृत्ती, सरकारी भरती आणि जनहिताच्या विषयांवर संशोधनाधारित माहिती मराठी भाषेत प्रकाशित करतात. प्रत्येक लेख तयार करताना अधिकृत सरकारी संकेतस्थळे, शासन निर्णय (GR), अधिसूचना, विभागीय परिपत्रके आणि संबंधित अधिकृत स्रोतांचा संदर्भ घेऊन माहितीची पडताळणी केली जाते. वाचकांना अर्ज प्रक्रिया, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, लाभ, अंतिम मुदत आणि महत्त्वाच्या अटी सोप्या व समजण्यास सुलभ भाषेत उपलब्ध करून देण्यावर त्यांचा भर असतो. Goresarkar.in चा उद्देश महाराष्ट्रातील शेतकरी, विद्यार्थी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत विश्वासार्ह, अद्ययावत आणि उपयुक्त माहिती पोहोचवणे हा आहे. प्रकाशित माहिती वेळोवेळी अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. अधिकृत निर्णयामध्ये बदल झाल्यास संबंधित लेख देखील अद्ययावत करण्यात येतात. या संकेतस्थळावरील माहिती ही केवळ जनजागृती आणि मार्गदर्शनाच्या उद्देशाने प्रकाशित केली जाते. कोणत्याही सरकारी योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहिती, नियम आणि अटींची पडताळणी करण्याचा सल्ला दिला जातो.… Read More

Related News
💬 Join WhatsApp