Pashusavardhan Vibhag Kadadpatre Upload Update : पशुसंवर्धन विभागामार्फत शेळीपालन, दुधाळ जनावरे वाटप, कुक्कुटपालन, आणि पशुधन व्यवस्थापन यासारख्या विविध योजनांअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान दिलं जातं. या योजनांसाठी ऑनलाइन अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे अपलोड केली आहेत.
काही लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड करताना चुकीची माहिती दिली असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे सूचना पाठवण्यात आल्या आहेत. संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या अर्जामधील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी १ जुलै २०२५ ते ३ जुलै २०२५ या कालावधीत सुधारित कागदपत्रे पुन्हा अपलोड करावी लागणार आहेत.
त्रुटी दुरुस्तीची अंतिम मुदत: १ जुलै ते ३ जुलै २०२५
अंतिम कागदपत्र पडताळणी: ४ ते ६ जुलै २०२५
अंतिम पात्र लाभार्थी यादी प्रसिद्ध होण्याची तारीख: ७ जुलै २०२५
शेतकऱ्यांनी दिलेल्या वेळेत कागदपत्रे पूर्णपणे अपलोड करून आपला अर्ज पूर्ण करावा, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे. अर्जात त्रुटी असल्यास अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
उमेश गोरे हे Goresarkar.in चे संस्थापक, लेखक आणि संपादक आहेत. ते केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या विविध सरकारी योजना, शेतीविषयक योजना, कृषी धोरणे, शेतकरी कल्याण, शिक्षण, शिष्यवृत्ती, सरकारी भरती आणि जनहिताच्या विषयांवर संशोधनाधारित माहिती मराठी भाषेत प्रकाशित करतात.
प्रत्येक लेख तयार करताना अधिकृत सरकारी संकेतस्थळे, शासन निर्णय (GR), अधिसूचना, विभागीय परिपत्रके आणि संबंधित अधिकृत स्रोतांचा संदर्भ घेऊन माहितीची पडताळणी केली जाते. वाचकांना अर्ज प्रक्रिया, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, लाभ, अंतिम मुदत आणि महत्त्वाच्या अटी सोप्या व समजण्यास सुलभ भाषेत उपलब्ध करून देण्यावर त्यांचा भर असतो.
Goresarkar.in चा उद्देश महाराष्ट्रातील शेतकरी, विद्यार्थी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत विश्वासार्ह, अद्ययावत आणि उपयुक्त माहिती पोहोचवणे हा आहे. प्रकाशित माहिती वेळोवेळी अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. अधिकृत निर्णयामध्ये बदल झाल्यास संबंधित लेख देखील अद्ययावत करण्यात येतात.
या संकेतस्थळावरील माहिती ही केवळ जनजागृती आणि मार्गदर्शनाच्या उद्देशाने प्रकाशित केली जाते. कोणत्याही सरकारी योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहिती, नियम आणि अटींची पडताळणी करण्याचा सल्ला दिला जातो.… Read More