राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना मिळणार 5 वर्षांसाठी मोफत वीज…

Author Picture
By Umesh Gore Writer
Published On: July 26, 2024
राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना मिळणार 5 वर्षांसाठी मोफत वीज…
— Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024

Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana 2024 : महाराष्ट्र राज्यातील कृषी वीज ग्राहकांना पुढील पाच वर्षांसाठी ७.५ एचपीपर्यंत मोफत वीज देण्याचा शासन निर्णय (GR) गुरुवारी घेण्यात आला. ही योजना एप्रिल 2024 ते मार्च 2029 पर्यंत लागू राहणार आहे. या योजनेचा लाभ 44 लाख तीन हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे.

राज्यातील ७.५ एचपीपर्यंत कृषी वीज वापरणाऱ्या शेतकऱ्यांना पुढील पाच वर्षांसाठी मोफत वीज देण्याचा शासन निर्णय (जीआर) गुरुवारी घेण्यात आला. ही योजना एप्रिल 2024 ते मार्च 2029 पर्यंत लागू राहणार आहे. या योजनेचा लाभ 44 लाख तीन हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे.

“मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024” योजनेचा तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर आढावा घेऊन पुढील कालावधीत ही योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे जीआरमध्ये म्हटले आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्प मांडताना शेतकऱ्यांना कृषी पंपावर मोफत वीज देण्याचा निर्णय जाहीर केला.

या वीज बिल माफीचा खर्च राज्य सरकार उचलणार आहे. सद्यस्थितीत 6,985 कोटी रुपये वीज दर सवलत आणि 7,775 कोटी रुपये वीज बिल माफी सवलत, 14,760 कोटी रुपये प्रतिवर्षी महावितरण कंपनीला शासनाकडून अदा करण्यात येणार आहे. या रकमेच्या योजनेच्या कालावधीत बदल झाल्यास ही रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला दिली जाईल.

आता ‘लाडक्या बहिणींना’ मिळणार सिलिंडरही मोफत; लवकरच अंमलबजावणी सुरु…

28 जून रोजी केलेल्या या घोषणेची सरकारने महिनाभरात अंमलबजावणी केली आहे.

  • मार्च 2024 पर्यंत राज्यात 47.41 लाख कृषी पंप ग्राहक शेतकरी आहेत. हे प्रमाण एकूण वीज ग्राहकांच्या तुलनेत 16 टक्के आहे. ३० टक्के वीज कृषी पंपांसाठी वापरली जाते.
  • सध्या कृषी ग्राहकांचा एकूण वार्षिक वीजवापर 39 हजार 246 दशलक्ष युनिट इतका आहे. कृषी पंपांना राज्यात रात्री ८/१० तास किंवा दिवसा ८ तास वीजपुरवठा केला जातो.

महावितरणचा फायदा

कृषी पंपाच्या बिलांच्या वसुलीसाठी महावितरण नेहमीच चिंतेत असते. मात्र, आता या वीज बिलातील 14,760 कोटी रुपये सरकार महावितरणला भरणार असताना त्यांची चिंता मिटणार आहे. 50 हजार कोटी रुपये कृषी पंप वीज बिलाची एकूण थकबाकी आहे. मात्र, गुरुवारच्या आदेशात वसुलीबाबतची स्थिती स्पष्ट झालेली नाही.

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Free electricity : सरकार देत आहे पंतप्रधान सूर्यघर योजने अंतर्गत माेफत वीज | बघा काय आहे योजना

Umesh Gore
Writer

उमेश गोरे हे Goresarkar.in चे संस्थापक, लेखक आणि संपादक आहेत. ते केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या विविध सरकारी योजना, शेतीविषयक योजना, कृषी धोरणे, शेतकरी कल्याण, शिक्षण, शिष्यवृत्ती, सरकारी भरती आणि जनहिताच्या विषयांवर संशोधनाधारित माहिती मराठी भाषेत प्रकाशित करतात. प्रत्येक लेख तयार करताना अधिकृत सरकारी संकेतस्थळे, शासन निर्णय (GR), अधिसूचना, विभागीय परिपत्रके आणि संबंधित अधिकृत स्रोतांचा संदर्भ घेऊन माहितीची पडताळणी केली जाते. वाचकांना अर्ज प्रक्रिया, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, लाभ, अंतिम मुदत आणि महत्त्वाच्या अटी सोप्या व समजण्यास सुलभ भाषेत उपलब्ध करून देण्यावर त्यांचा भर असतो. Goresarkar.in चा उद्देश महाराष्ट्रातील शेतकरी, विद्यार्थी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत विश्वासार्ह, अद्ययावत आणि उपयुक्त माहिती पोहोचवणे हा आहे. प्रकाशित माहिती वेळोवेळी अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. अधिकृत निर्णयामध्ये बदल झाल्यास संबंधित लेख देखील अद्ययावत करण्यात येतात. या संकेतस्थळावरील माहिती ही केवळ जनजागृती आणि मार्गदर्शनाच्या उद्देशाने प्रकाशित केली जाते. कोणत्याही सरकारी योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहिती, नियम आणि अटींची पडताळणी करण्याचा सल्ला दिला जातो.… Read More

Related News
💬 Join WhatsApp