शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! आता खात्यात थेट येणार योजना रक्कम

Author Picture
By Umesh Gore Writer
Published On: July 24, 2025
शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! आता खात्यात थेट येणार योजना रक्कम
— Krushi Samruddhi Yojana 2025

Krushi Samruddhi Yojana 2025 : राज्यातील शेतकऱ्यांना हवामानातील बदलांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींवर मात देण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने एका महत्त्वपूर्ण योजनेची सुरुवात केली आहे.

‘कृषी समृद्धी योजना 2025’ असे या योजनेचे नाव असून, पुढील पाच वर्षांसाठी सुमारे २५,००० कोटी रुपयांची भांडवली तरतूद करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना DBT (Direct Benefit Transfer) पद्धतीने थेट बँक खात्यावर अनुदान जमा होणार आहे. या योजनेची अंमलबजावणी २०२५-२६ पासून सुरू होणार आहे.

राज्यात पूर्वीच्या पीक विमा योजनांमधील त्रुटी लक्षात घेऊन नव्याने सुधारित योजना राबवली जाणार आहे. ‘कृषी समृद्धी’ या योजनेचा उद्देश म्हणजे शेतीशी संबंधित पायाभूत सुविधांचा विकास, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार, आणि शेतकऱ्यांना नवीन संधी मिळवून देणे.

क्लस्टर आधारित शेतीस प्रोत्साहन

  • शेतकरी गटांनी एकत्र येऊन शेती करणे प्रोत्साहित केले जाईल.
  • इनपुट खर्चात बचत, प्रक्रियेस मदत, आणि मार्केटिंगसाठी सामायिक धोरण राबवले जाईल.
  • सिंचन, कोल्ड स्टोरेज, पॅक हाऊस यांसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.
  • पारदर्शक यंत्रणा व काटेकोर अंमलबजावणीमुळे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल.

अनुदानाचे स्वरूप

  • यांत्रिकीकरण, संरक्षित शेती (शेडनेट, पॉलीहाऊस), क्रॉप कव्हर, मल्चिंग पेपर, इत्यादीसाठी अनुदान उपलब्ध.
  • विमा योजनेसाठी शेतकऱ्यांना नाममात्र प्रीमियम भरावा लागतो (२%, १.५%, ५%). उर्वरित रक्कम शासनाकडून भरली जाते.
  • क्लस्टर यादीतील गटशेतीस प्राधान्य दिले जाणार आहे.

कोण मिळवू शकतो लाभ?

  • जमीनधारक शेतकरी, गटशेती करणारे, शेतकरी उत्पादक कंपन्या/संघ यांना लाभ मिळू शकतो.
  • केंद्र शासनाच्या पात्रता निकषांनुसार लहान, मध्यम व मोठे शेतकरी यामध्ये समाविष्ट आहेत.
Umesh Gore
Writer

उमेश गोरे हे Goresarkar.in चे संस्थापक, लेखक आणि संपादक आहेत. ते केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या विविध सरकारी योजना, शेतीविषयक योजना, कृषी धोरणे, शेतकरी कल्याण, शिक्षण, शिष्यवृत्ती, सरकारी भरती आणि जनहिताच्या विषयांवर संशोधनाधारित माहिती मराठी भाषेत प्रकाशित करतात. प्रत्येक लेख तयार करताना अधिकृत सरकारी संकेतस्थळे, शासन निर्णय (GR), अधिसूचना, विभागीय परिपत्रके आणि संबंधित अधिकृत स्रोतांचा संदर्भ घेऊन माहितीची पडताळणी केली जाते. वाचकांना अर्ज प्रक्रिया, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, लाभ, अंतिम मुदत आणि महत्त्वाच्या अटी सोप्या व समजण्यास सुलभ भाषेत उपलब्ध करून देण्यावर त्यांचा भर असतो. Goresarkar.in चा उद्देश महाराष्ट्रातील शेतकरी, विद्यार्थी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत विश्वासार्ह, अद्ययावत आणि उपयुक्त माहिती पोहोचवणे हा आहे. प्रकाशित माहिती वेळोवेळी अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. अधिकृत निर्णयामध्ये बदल झाल्यास संबंधित लेख देखील अद्ययावत करण्यात येतात. या संकेतस्थळावरील माहिती ही केवळ जनजागृती आणि मार्गदर्शनाच्या उद्देशाने प्रकाशित केली जाते. कोणत्याही सरकारी योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहिती, नियम आणि अटींची पडताळणी करण्याचा सल्ला दिला जातो.… Read More

Related News
💬 Join WhatsApp