फक्त 300 रुपयांत LPG सिलेंडर! जाणून घ्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची सविस्तर माहिती

Author Picture
By Umesh Gore Writer
Published On: July 1, 2025
फक्त 300 रुपयांत LPG सिलेंडर! जाणून घ्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची सविस्तर माहिती

Pm Ujjwala Yojana 300 Rupay Cylinder : सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 14.2 किलो एलपीजी सिलेंडर फक्त 300 रुपयांत मिळतो. केंद्र सरकारने यासाठी सबसिडी वाढवली असून, 31 मार्च 2025 पर्यंत ही सवलत लागू आहे.

उज्वला योजना म्हणजे काय?

2016 साली सुरू झालेली ही योजना गरीब, ग्रामीण आणि वंचित गटातील महिलांना स्वच्छ इंधन – म्हणजेच एलपीजी गॅस – देण्यासाठी सुरू करण्यात आली. यामुळे पारंपरिक चुलीमधील धुरामुळे होणारे आरोग्याचे धोके कमी होतात.

या योजनेत काय मिळतं?

  • मोफत गॅस कनेक्शन
  • पहिलं रिफिल मोफत
  • गॅस चूल
  • दर महिन्याला 300 रुपयांची सबसिडी (12 सिलेंडरपर्यंत)

या योजनेसाठी पात्रता काय?

  1. अर्जदार महिला भारतीय नागरिक असावी
  2. वय 18 वर्षांपेक्षा अधिक
  3. गरीबी रेषेखालील कुटुंबातील सदस्य
  4. आधीपासून गॅस कनेक्शन नसलेलं घर
  5. SC/ST/OBC, AAY, वनवासी, पीएम आवास लाभार्थी, SECC यादीतील महिलांना प्राधान्य

अर्जासाठी लागणारी कागदपत्रं

  • आधार कार्ड
  • बीपीएल रेशन कार्ड
  • बँक पासबुक
  • पत्त्याचा पुरावा
  • वयाचा पुरावा
  • पासपोर्ट साइज फोटो
  • जातीचा दाखला (लागू असल्यास)

महत्त्वाचं: बँक खाते आधारशी लिंक असणं गरजेचं आहे, जेणेकरून सबसिडी थेट खात्यात जमा होईल.

अर्ज कसा करायचा?

ऑनलाईन:

  1. www.pmuy.gov.in वर जा
  2. “Apply for New Ujjwala 2.0 Connection” वर क्लिक करा
  3. गॅस एजन्सी निवडा (इंडेन, भारत, HP)
  4. फॉर्म भरून सबमिट करा
  5. प्रिंटआउट घेऊन कागदपत्रांसह जवळच्या गॅस एजन्सीमध्ये जमा करा

ऑफलाइन:

  1. जवळच्या गॅस वितरकाकडे फॉर्म मिळवा
  2. तो भरून आवश्यक कागदपत्रांसह जमा करा
  3. सत्यापनानंतर कनेक्शन मिळेल
Umesh Gore
Writer

उमेश गोरे हे Goresarkar.in चे संस्थापक, लेखक आणि संपादक आहेत. ते केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या विविध सरकारी योजना, शेतीविषयक योजना, कृषी धोरणे, शेतकरी कल्याण, शिक्षण, शिष्यवृत्ती, सरकारी भरती आणि जनहिताच्या विषयांवर संशोधनाधारित माहिती मराठी भाषेत प्रकाशित करतात. प्रत्येक लेख तयार करताना अधिकृत सरकारी संकेतस्थळे, शासन निर्णय (GR), अधिसूचना, विभागीय परिपत्रके आणि संबंधित अधिकृत स्रोतांचा संदर्भ घेऊन माहितीची पडताळणी केली जाते. वाचकांना अर्ज प्रक्रिया, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, लाभ, अंतिम मुदत आणि महत्त्वाच्या अटी सोप्या व समजण्यास सुलभ भाषेत उपलब्ध करून देण्यावर त्यांचा भर असतो. Goresarkar.in चा उद्देश महाराष्ट्रातील शेतकरी, विद्यार्थी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत विश्वासार्ह, अद्ययावत आणि उपयुक्त माहिती पोहोचवणे हा आहे. प्रकाशित माहिती वेळोवेळी अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. अधिकृत निर्णयामध्ये बदल झाल्यास संबंधित लेख देखील अद्ययावत करण्यात येतात. या संकेतस्थळावरील माहिती ही केवळ जनजागृती आणि मार्गदर्शनाच्या उद्देशाने प्रकाशित केली जाते. कोणत्याही सरकारी योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहिती, नियम आणि अटींची पडताळणी करण्याचा सल्ला दिला जातो.… Read More

Related News
💬 Join WhatsApp