लाडकी बहीण योजना अपडेट : लाखो लाभार्थ्यांचा हफ्ता बंद होण्याची शक्यता? अपात्र लाभार्थी शोधण्यासाठी IT विभागाची मदत

Author Picture
By Umesh Gore Writer
Published On: June 30, 2025
लाडकी बहीण योजना अपडेट : लाखो लाभार्थ्यांचा हफ्ता बंद होण्याची शक्यता? अपात्र लाभार्थी शोधण्यासाठी IT विभागाची मदत

Ladaki Bahin Yojana Update : राज्यातील लाडकी बहीण योजना सध्या चर्चेचा विषय बनली आहे. कारण राज्य सरकारकडून या योजनेतील लाभार्थ्यांची काटेकोर पडताळणी सुरू आहे. त्यामुळे अनेक महिलांचे अर्ज रद्द होत असून, आता सरकारने थेट इन्कम टॅक्स विभागाशी सामंजस्य करार करण्याचा निर्णय घेतला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, या कराराच्या माध्यमातून अपात्र लाभार्थ्यांची ओळख पटवण्यास मदत होणार आहे. अर्जदारांची माहिती गोपनीय राहील, याचीही खात्री सरकारने दिली आहे.

आत्तापर्यंत बाद झालेल्या अर्जांची माहिती अशी :

  • संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी – 2.30 लाख
  • 65 वर्षांहून अधिक वयाच्या महिला – 1.10 लाख
  • कुटुंबातील चारचाकी वाहनधारक, नमोशक्ती योजनेचे लाभार्थी आणि योजना सोडणाऱ्या महिला – 1.60 लाख
  • एकूण अपात्र महिला – 5 लाख

सरकारच्या आर्थिक तणावामुळे आणि वाढीव हफ्ता (₹2100) न देण्याच्या भूमिकेमुळे अनेकांच्या शंका अधिक बळावल्या आहेत. शिंदे गटातील काही मंत्र्यांनीही लाडकी योजनेवर खर्च जास्त होत असल्याचे खुलेपणाने कबूल केले आहे. त्यामुळे लवकरच आणखी अर्ज रद्द होण्याची शक्यता आहे.

राज्याच्या तिजोरीवर भार कमी करण्यासाठी आणि योग्य लाभार्थ्यांपर्यंतच योजना पोहोचावी यासाठी सरकारचा प्रयत्न सुरू आहे. येत्या काही महिन्यांत लाडकी लाभार्थ्यांची संख्या आणखी कमी होऊ शकते.

Umesh Gore
Writer

उमेश गोरे हे Goresarkar.in चे संस्थापक, लेखक आणि संपादक आहेत. ते केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या विविध सरकारी योजना, शेतीविषयक योजना, कृषी धोरणे, शेतकरी कल्याण, शिक्षण, शिष्यवृत्ती, सरकारी भरती आणि जनहिताच्या विषयांवर संशोधनाधारित माहिती मराठी भाषेत प्रकाशित करतात. प्रत्येक लेख तयार करताना अधिकृत सरकारी संकेतस्थळे, शासन निर्णय (GR), अधिसूचना, विभागीय परिपत्रके आणि संबंधित अधिकृत स्रोतांचा संदर्भ घेऊन माहितीची पडताळणी केली जाते. वाचकांना अर्ज प्रक्रिया, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, लाभ, अंतिम मुदत आणि महत्त्वाच्या अटी सोप्या व समजण्यास सुलभ भाषेत उपलब्ध करून देण्यावर त्यांचा भर असतो. Goresarkar.in चा उद्देश महाराष्ट्रातील शेतकरी, विद्यार्थी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत विश्वासार्ह, अद्ययावत आणि उपयुक्त माहिती पोहोचवणे हा आहे. प्रकाशित माहिती वेळोवेळी अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. अधिकृत निर्णयामध्ये बदल झाल्यास संबंधित लेख देखील अद्ययावत करण्यात येतात. या संकेतस्थळावरील माहिती ही केवळ जनजागृती आणि मार्गदर्शनाच्या उद्देशाने प्रकाशित केली जाते. कोणत्याही सरकारी योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहिती, नियम आणि अटींची पडताळणी करण्याचा सल्ला दिला जातो.… Read More

Related News
💬 Join WhatsApp