Ladki Bahin Yojana Update : राज्य सरकार राज्यातील सेतू केंद्र चालकांना मुख्यमंत्री माझी बहन लाडकी योजनेत नाव नोंदणी करण्यासाठी 50 रुपये देणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांकडून पैसे घेतल्यास त्यांचा परवाना रद्द करण्यात येईल, असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत बोलताना दिला.
या योजनेसाठी लाभार्थ्यांकडे शिधापत्रिका असल्यास त्यांना राहण्याच्या जागेची गरज नाही. योजनेत नाव नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. कुटुंबातील दोन महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल, असेही फडणवीस म्हणाले.