Farmers Laon Update : या राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी | पहा किती आहे प्रती शेतकरी कर्ज.


व्हॉट्सॲप ग्रुप           येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा

farmer-loan-waiver-noose-updates : देशभरातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले पाहिजे. या मागणीसाठी राजधानी दिल्लीत लाखो शेतकरी आंदोलन करत आहेत. अशा परिस्थितीत हरियाणा सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे.

राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी राज्यातील शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जावरील सर्व व्याज माफ करण्याची घोषणा केली आहे. तसेच, सभागृहात अर्थसंकल्प मांडताना शेतकऱ्यांच्या कर्जावरील दंडाची रक्कमही सरकार भरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात प्रति शेतकरी 1.58 लाख रुपये कर्ज (Farmers Loan Interest Waiver)

राष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बँकेच्या (नाबार्ड) आकडेवारीनुसार, सध्यस्थितीत पंजाबमधील शेतकऱ्यांवर सर्वाधिक कर्ज (Farmers Loan) आहे. तेथे प्रति शेतकरी 2.95 लाख रुपये इतके आहे. तर महाराष्ट्रात देखील खातेधारक शेतकऱ्यांची संख्या एक कोटीहून अधिक असून, महाराष्ट्रात प्रति शेतकरी 1.58 लाख रुपये इतके कर्ज आहे.

हे पण वाचा : पंतप्रधान मोदींची एकूण संपत्ती किती आहे? समोर आली धक्कादायक माहिती.

महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची एकूण कर्जाची रक्कम 1 लाख 61 हजार 471 कोटी रुपये इतकी आहे. त्यामुळे आता लवकरच महाराष्ट्र सरकार देखील आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात शिंदे- फडणवीस सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना देखील कर्जाबाबत काहीतरी दिलासा द्यावा. अशी आशा राज्यभरातील शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.

साडेपाच लाख शेतकऱ्यांना फायदा

दरम्यान, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी शुक्रवारी (ता. 24) राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी ही व्याजमाफीची घोषणा केली असून, याचा हरियाणातील जवळपास 5 लाख 47 हजार शेतकऱ्यांना थेट फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे.

अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी म्हटले आहे की, मी देखील एका शेतकऱ्याचा मुलगा असून, मला शेतकऱ्यांचे दुःख माहिती आहे. मी देखील शेतीमध्ये नांगर हाकला आहे. त्यामुळे यावेळेच्या अर्थसंकलपात शेतकऱ्यासांठी भरीव तरतुद केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हे पण वाचा : Grain Storage Scheme : सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केली’गोदाम योजना’ ; बघा काय होणार फायदा?

29,876 कोटींची खरेदी 

मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी म्हटले आहे की, हरियाणामध्ये 2023-24 यावर्षी कृषी उत्पादनात 8.1 टक्के वाढ झाली आहे. जी देशभरातील सर्वाधिक आहे.

याशिवाय मागील तीन वर्षात सरकारने किमान आधारभूत किमतीने अर्थात हमीभावाने 14 पिकांची खरेदी केलेली असून, शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचे पैसे थेट बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहे.

चालू वर्षीच्या 2023 च्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी 29,876 कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहेत. अशी माहितीही त्यांनी सभागृहात दिली आहे.

हे पण वाचा : खुशखबर! राज्यात 3.87 लाख रुपयांच्या विहिरीसाठी निविदा,मागेल त्याला विहिरीसाठी 4 लाख रुपये देणार, अंतराची अटही रद्द

इतरांना शेअर करा.......

My name is Umesh Gore. I am a blogger, youtuber and wordpress developer. I have more than 5 years of experience in this field.