Jalgaon to Ahmedabad flight service update : जळगावकरांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच जळगाव विमानतळावरून अहमदाबादसाठी विमानसेवा सुरू होणार असल्याची माहिती जळगाव विमानतळ प्राधिकरणाकडून प्राप्त झाली आहे.
जळगाव विमानतळावरून गोवा, पुणे, हैदराबाद आणि मुंबईसाठी विमानसेवा आहे. आता लवकरच जळगाव-अहमदाबाद विमानसेवा सुरू होणार असून ही विमानसेवा आठवड्यातून तीन दिवस असणार असल्याची माहिती समोर येत आहे. ही विमानसेवा मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी सुरू होणार आहे. अहमदाबादहून जळगावसाठी संध्याकाळी ५.४० वाजता विमान सुटेल.
सात वाजता जळगावला पोहोचेल. जळगावहून अहमदाबादला संध्याकाळी ७.२५ वाजता विमान उड्डाण करेल. जळगाव जिल्ह्यातील व शहरातील व्यापारी वर्ग अहमदाबाद विमानसेवा सुरू करण्याच्या विचारात होता. हा प्रयत्न यशस्वी झाला असून व्यापारी वर्गाला या हवाई सेवेचा फायदा होणार आहे.
जळगाव-मुंबई तीन दिवसीय विमानसेवा आता चार दिवसांसाठी मुंबई-जळगाव विमानसेवा सुरू करणार आहे. रविवार, सोमवार, गुरुवार आणि शुक्रवारी विमानसेवा सुरू होईल.
उमेश गोरे हे Goresarkar.in चे संस्थापक, लेखक आणि संपादक आहेत. ते केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या विविध सरकारी योजना, शेतीविषयक योजना, कृषी धोरणे, शेतकरी कल्याण, शिक्षण, शिष्यवृत्ती, सरकारी भरती आणि जनहिताच्या विषयांवर संशोधनाधारित माहिती मराठी भाषेत प्रकाशित करतात.
प्रत्येक लेख तयार करताना अधिकृत सरकारी संकेतस्थळे, शासन निर्णय (GR), अधिसूचना, विभागीय परिपत्रके आणि संबंधित अधिकृत स्रोतांचा संदर्भ घेऊन माहितीची पडताळणी केली जाते. वाचकांना अर्ज प्रक्रिया, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, लाभ, अंतिम मुदत आणि महत्त्वाच्या अटी सोप्या व समजण्यास सुलभ भाषेत उपलब्ध करून देण्यावर त्यांचा भर असतो.
Goresarkar.in चा उद्देश महाराष्ट्रातील शेतकरी, विद्यार्थी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत विश्वासार्ह, अद्ययावत आणि उपयुक्त माहिती पोहोचवणे हा आहे. प्रकाशित माहिती वेळोवेळी अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. अधिकृत निर्णयामध्ये बदल झाल्यास संबंधित लेख देखील अद्ययावत करण्यात येतात.
या संकेतस्थळावरील माहिती ही केवळ जनजागृती आणि मार्गदर्शनाच्या उद्देशाने प्रकाशित केली जाते. कोणत्याही सरकारी योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहिती, नियम आणि अटींची पडताळणी करण्याचा सल्ला दिला जातो.… Read More