टीम इंडियावर शिंदे सरकारने केली कोट्यावधीची उधळण.. या खेळाडूंना प्रत्येकी १ कोटी…


व्हॉट्सॲप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा.......

Team India : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल यांना प्रत्येकी एक कोटी रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.

विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियावर कौतुक आणि पुरस्कारांचा वर्षाव सुरू होताना दिसत आहे. टीम इंडियाच्या विजेत्या संघाचा भाग असलेल्या महाराष्ट्रातील चार खेळाडूंना राज्य सरकारकडून प्रत्येकी एक कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासह महाराष्ट्रातील चार खेळाडूंचा शुक्रवारी विधानसभेत गौरव करण्यात येणार असून त्याचवेळी पुरस्कारही देण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

विजेत्या टीम इंडियाचे मुंबईत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले आणि वानखेडे स्टेडियमवर त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे उपस्थित होते.

रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल या चार खेळाडूंचा शुक्रवारी दुपारी चार वाजता विधानभवन सेंट्रल हॉलमध्ये भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या चार खेळाडूंना राज्य सरकारकडून प्रत्येकी एक कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. मुख्यमंत्री शुक्रवारी ही रक्कम जाहीर करणार आहेत.

Ladki Bahin Yojana : उत्पन्नाचा दाखला व डोमेसिएल सर्टिफिकेट नसले तरी मिळणार 1500 रुपये; सरकारने बदलला निर्णय

टीम इंडियाचा 125 कोटी रुपयांचा सन्मान

टीम इंडियाचा सत्कार कार्यक्रम वानखेडे स्टेडियमवर आयोजित करण्यात आला असून येथे टीम इंडियाचा 125 कोटी रुपये देऊन सत्कार करण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी बीसीसीआयचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

टीम इंडियाचे मुंबईत स्वागत

वर्ल्ड कप विजेती टीम इंडिया गुरुवारी संध्याकाळी मुंबईत पोहोचली. याआधी मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर क्रिकेटप्रेमींची मोठी गर्दी झाली होती. मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर लोकांचा समुद्र उसळलेला दिसत होता. येथे तीन लाखांहून अधिक चाहते जमल्याचा अंदाज आहे.

मुंबई विमानतळावर सर्वप्रथम अग्निशमन दलाने टीम इंडियाच्या विमानाला वॉटर सॅल्युट दिली. यानंतर टीम इंडिया विशेष बसने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पोहोचली. वानखेडे मैदानावर टीम इंडियाच्या स्वागतासाठी मोठी गर्दी झाली असून मैदान खचाखच भरले आहे. वानखेडे मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा लोकांचा समुद्र उडालेला दिसतो.

भारतीय संघाचे स्वागत करण्यासाठी सर्वत्र क्रिकेटप्रेमी आणि क्रिकेट रसिकांची गर्दी झालेली पाहायला मिळते. मुंबईतील मरीन ड्राईव्हवरील गर्दी पाहून मुंबई पोलिसांनी मुंबईकरांना एक महत्त्वाचे आवाहन केले आहे. नागरिकांनी यापुढे मरिन ड्राइव्हवर येऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

लाडकी बहिन योजना : लाडकी बहीण योजनेचा फॉर्म घरबसल्या भरा आता मोबाईलवर; नवीन ॲप लॉन्च


इतरांना शेअर करा.......

My name is Umesh Gore. I am a blogger, youtuber and wordpress developer. I have more than 5 years of experience in this field.

Leave a Comment