अपात्र शिधापत्रिका तपासणी मोहीम सुरु – आवश्यक कागदपत्रे सादर न केल्यास राशन बंद

Author Picture
By Umesh Gore Writer
Published On: June 30, 2025
अपात्र शिधापत्रिका तपासणी मोहीम सुरु – आवश्यक कागदपत्रे सादर न केल्यास राशन बंद

Apatra Ration Card Tapasni Mohim Documents : राज्यात अपात्र शिधापत्रिका धारकांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. शिधा व्यवस्थापन प्रणालीमध्ये सध्या ७००.१६ लाख कार्डधारकांची नोंद आहे. ही संख्या मर्यादित असल्याने नवीन लाभार्थ्यांना समाविष्ट करणे शक्य नसल्यामुळे, अपात्र, दुबार, स्थलांतरित आणि मृत लाभार्थ्यांची छाननी करून त्यांना यादीतून वगळण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे.

कोणाच्या शिधापत्रिकांची होणार तपासणी?

  • अंत्योदय अन्न योजना (AAY)
  • प्राधान्य कुटुंब योजनेतील (PHH) लाभार्थ्यांची तपासणी होणार आहे.

अर्जासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे:

निवासाचा पुरावा म्हणून खालीलपैकी कोणतेही एक कागदपत्र जोडावे:

  • भाडेकरार/भाडेपावती
  • मालकीच्या घराचा पुरावा
  • एलपीजी जोडणी क्रमांक
  • वीज बिल
  • मोबाईल/टेलिफोन बिल
  • बँक पासबुक
  • वाहन परवाना
  • मतदार ओळखपत्र
  • आधार कार्ड

अर्जदारांना कोणतेही शुल्क लागणार नाही

या तपासणीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. जर कोणी पैसे मागत असेल, तर संबंधित व्यक्तीविरोधात तक्रार करता येते.

तक्रारीसाठी ऑनलाईन लिंक:

ऑनलाईन तक्रार लिंक येथे क्लिक करा

शिधापत्रिका तपासणी अर्ज नमुना कसा मिळवावा?

शासनाने दिलेला अर्ज नमुना PDF स्वरूपात उपलब्ध आहे. तो मोबाईल किंवा संगणकावर सहज डाउनलोड करता येतो.

📥 शिधापत्रिका तपासणी अर्ज डाउनलोड करा

राशन कार्ड क्रमांक माहित नसल्यास काय करावे?

तुमचा १२ अंकी राशन कार्ड नंबर माहित नसल्यास, खालील लिंकवरून तो मिळवा:

माहिती कुणी भरायची?

हा अर्ज भरायची जबाबदारी राशन दुकानदार किंवा संबंधित अधिकाऱ्यांवर आहे. राशन कार्डधारकाने स्वतः कोणतीही माहिती भरायची गरज नाही.

टीप: कागदपत्रे देताना अधिक माहिती किंवा अडचण असल्यास, आपल्या गावातील राशन दुकानदाराशी संपर्क करा.

Umesh Gore
Writer

उमेश गोरे हे Goresarkar.in चे संस्थापक, लेखक आणि संपादक आहेत. ते केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या विविध सरकारी योजना, शेतीविषयक योजना, कृषी धोरणे, शेतकरी कल्याण, शिक्षण, शिष्यवृत्ती, सरकारी भरती आणि जनहिताच्या विषयांवर संशोधनाधारित माहिती मराठी भाषेत प्रकाशित करतात. प्रत्येक लेख तयार करताना अधिकृत सरकारी संकेतस्थळे, शासन निर्णय (GR), अधिसूचना, विभागीय परिपत्रके आणि संबंधित अधिकृत स्रोतांचा संदर्भ घेऊन माहितीची पडताळणी केली जाते. वाचकांना अर्ज प्रक्रिया, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, लाभ, अंतिम मुदत आणि महत्त्वाच्या अटी सोप्या व समजण्यास सुलभ भाषेत उपलब्ध करून देण्यावर त्यांचा भर असतो. Goresarkar.in चा उद्देश महाराष्ट्रातील शेतकरी, विद्यार्थी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत विश्वासार्ह, अद्ययावत आणि उपयुक्त माहिती पोहोचवणे हा आहे. प्रकाशित माहिती वेळोवेळी अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. अधिकृत निर्णयामध्ये बदल झाल्यास संबंधित लेख देखील अद्ययावत करण्यात येतात. या संकेतस्थळावरील माहिती ही केवळ जनजागृती आणि मार्गदर्शनाच्या उद्देशाने प्रकाशित केली जाते. कोणत्याही सरकारी योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहिती, नियम आणि अटींची पडताळणी करण्याचा सल्ला दिला जातो.… Read More

Related News
💬 Join WhatsApp