जळगाव तालुक्यातील सुभाषवाडी येथे गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उदघाटन…

इतरांना शेअर करा.......

दिनांक 24 12 2023 रोजी माननीय गुलाबराव पाटील यांनी जळगाव तालुक्यातील सुभाष वाडी गावातील नवीन ग्रामपंचायत इमारतीचे उद्घाटन केले.

गुलाबराव पाटील यांनी वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेतून श्री संत सेवालाल महाराज सभागृहासाठी 15 लाखांचे अनुदान देण्याचे आश्वासन दिले.

तसेच समशान भूमी कडे जाण्याचा मार्ग तयार करण्यासाठी पाच लाख रुपयाचे अनुदान देण्याचे आश्वासन सुद्धा त्यांनी दिले.

तसेच पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांसाठी लोकसहभागातून तयार केलेले ग्राउंड चे उद्घाटन पोलीस निरीक्षक जयपाल यांच्या हस्ते करण्यात आले.

उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले मान्यवर सुभाष वाडीतील महिला सरपंच जयश्री राठोड, उपसरपंच छगनदास राठोड, राजाराम राठोड, गुलाब राठोड,पुनम चंद राठोड, विनोद पवार, प्रेम सिंग राठोड, पुंडलिक राठोड,श्रावण राठोड, कबीर जाधव, रामचंद्र राठोड आणि गावातील समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.

अशी माहिती गावातील तरुण कसंनदास राठोड यांनी पत्रकारांना दिली.


इतरांना शेअर करा.......

Leave a Comment