जळगाववासीयांसाठी खूशखबर! आता जळगाव ते मुंबई विमानसेवा सुरू होणार…


व्हॉट्सॲप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा.......

Jalgaon To Mumbai Flight Updates 2024 : एप्रिल महिन्यात जळगाव विमानतळ ते हैदराबाद आणि गोवा या विमानसेवेला प्रवाशांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर जळगाव ते पुणे विमानसेवाही गेल्या आठवड्यात सुरू झाली.

त्यानंतर लवकरच मुंबई-जळगाव विमानसेवा सुरू होणार आहे. भारत सरकारच्या अलायन्स एअरलाइन्स कंपनीकडून ही सेवा दिली जाणार असून अंतिम मंजुरीची प्रक्रिया सुरू असल्याने जून महिन्यात ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.

मुंबई ते जळगाव दरम्यान विमानसेवा सुरू करण्यासाठी विमान कंपनीला नुकतीच प्राथमिक परवानगी मिळाली आहे. सध्या उडान 5.0 योजनेंतर्गत जळगाव-पुणे विमानसेवा जळगाव विमानतळावरून गोवा, हैद्राबाद अशी एप्रिलमध्ये सुरू करण्यात आली होती आणि 27 मेपासून मुंबईसाठी जळगाव-पुणे विमानसेवाही सुरू होत आहे.

आता आठवड्यातून चार दिवस जळगाव ते पुणे विमानसेवा; वेळापत्रक पहा?

भारत सरकारच्या ‘अलायन्स’ या विमान कंपनीकडून मुंबई-जळगाव विमानसेवा लवकरच सुरू होणार आहे. वास्तविक, जगभरात सुवर्णनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या जळगाव शहरातील लोक शिक्षण, पर्यटन, नोकरी, व्यवसाय अशा विविध कामांसाठी राजधानीत येतात. मात्र, सध्या जळगाव शहरातून मुंबईला जाण्यासाठी प्रवास किंवा रेल्वेचे पर्याय उपलब्ध आहेत.

रेल्वेने प्रवास करायचा असेल तर साधारण आठ तासांचा प्रवास करावा लागेल आणि ट्रॅव्हल्सने प्रवास करायचा असेल तर दहा तासांपेक्षा जास्त वेळ द्यावा लागणार आहे. त्यामुळे मुंबईत येणे आणि काम उरकून घरी जाणे कठीण होते. रेल्वे आणि ट्रॅव्हल्स कामी येतात. त्यामुळे या मार्गावर नवीन विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी अनेकांकडून होत होती.

अखेर या मागणीच्या अनुषंगाने मुंबई-जळगाव विमानसेवेला अलायन्स एअरलाइन्सने मान्यता दिली असून जून महिन्यात ही विमानसेवा सुरू होणार आहे. मुंबई-जळगाव विमानसेवा सुरू झाल्याने अर्ध्या ते एक तासात मुंबई गाठता येणार आहे. व्यावसायिकांना या सेवेचा मोठा फायदा होणार आहे.

खुशखबर ! या तिन्ही शहरांसाठी लवकरच जळगावहून विमानसेवा सुरू होणार आहे.


इतरांना शेअर करा.......

My name is Umesh Gore. I am a blogger, youtuber and wordpress developer. I have more than 5 years of experience in this field.

Leave a Comment