JALGAON AIRPORT NEWS UPDATE : 7 मार्च 2024 जळगाववासीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे, केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत लवकरच जळगाव विमानतळावरून हैदराबाद, गोवा, पुणे अशी विमानसेवा सुरू होणार आहे. यासाठी ‘फ्लाय 91’ या विमान कंपनीला बुधवारी (ता. 6) भारत सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाच्या अंतर्गत नागरी विमान वाहतूक महासंचालक म्हणजेच DGCA कडून परवानगी मिळाली आहे. एका आठवड्यात उड्डाणाचे वेळापत्रक जाहीर केले जाईल, असे सांगण्यात येत आहे.
जळगावची विमानसेवा गेल्या तीन वर्षांपासून बंद आहे. विमानसेवा अचानक बंद झाल्यानंतर जळगाव विमानतळावरून एकही विमानसेवा सुरू नव्हती. गेल्या वर्षी, उडान योजनेच्या तिसऱ्या फेरीत, नव्याने स्थापन झालेली ‘फ्लाय 91’ ही विमान कंपनी जळगावहून पुणे, गोवा आणि हैदराबादसाठी एकाच वेळी उड्डाणे सुरू करण्याच्या तयारीत आहे.
परंतु; केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांतील निवडणूक प्रचारात अडकले होते. अखेर सर्व मान्यतेनंतर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या महासंचालकांनी बुधवारी प्रमाणपत्र दिले. त्यामुळे जळगाव विमानतळावरून पुणे, गोवा, हैदराबाद अशी विमानसेवा लवकरच सुरू होणार आहे.
हे पण वाचा : महाशिवरात्री 2024: महाशिवरात्री का साजरी केली जाते? या संबंधित तीन पौराणिक कथा जाणून घ्या