रेशन दुकानातून ‘मोदी सरकार हमी’ पिशव्यांचे वाटप


व्हॉट्सॲप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा.......

मार्च महिन्याचे धान्य खरेदी करण्यासाठी रेशन दुकानांवर जाणाऱ्या लाभार्थ्यांना ‘मोदी सरकार हमी, सर्वाना धान्य आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चित्र असलेल्या पिशव्यांचे वाटप करण्यात येत आहे.

रेशन दुकानातून ‘मोदी सरकार हमी’ पिशव्यांचे वाटप

हर्षद कशाळकर

Distribution of bags guaranteed by Modi government : मार्च महिन्याचे धान्य खरेदी करण्यासाठी रेशन दुकानावर आलेल्या लाभार्थ्यांना ‘मोदी सरकार हमी, सर्वाना ध्यान’ असे शब्द आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चित्र असलेल्या पिशव्यांचे वाटप करण्यात येत आहे. या पिशव्यांवर लिहिलेला मजकूर पुढील पाच वर्षांसाठी मोफत धान्य वाटपाची हमी देतो.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला दहा किलो क्षमतेची ‘डी कट लॅमिनेटेड’ पिशवी वितरित केली जात आहे. या पिशव्यांचे राज्यभरातील अंत्योदय आणि प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारकांना वाटप करण्यात येणार आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने सर्व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही या पिशव्या ई-पास प्रणालीद्वारे युद्धपातळीवर वितरित करण्याचे आदेश दिले आहेत.

हे पण वाचा>>> शिधापत्रिका धारकांसाठी महत्त्वाची बातमी, रेशनसोबत मिळणार आता या गोष्टी

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत अंत्योदय कुटुंबांना दरमहा 35 किलो आणि प्राधान्य कुटुंबांना प्रति व्यक्ती 5 किलो धान्य वितरित केले जात आहे. या योजनेअंतर्गत 80 कोटी लाभार्थ्यांना पुढील पाच वर्षांसाठी मोफत धान्य दिले जाणार आहे. यासाठी केंद्र सरकार 12 लाख कोटी रुपये खर्च करणार आहे. ही मोदी सरकारची हमी आहे, असे धान्य वितरणाच्या पोत्यावर लिहिले आहे. हा मजकूर असा आहे की, “प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा एकच उद्देश आहे की कोणताही भाऊ, बहीण, कोणताही भारतीय उपाशी राहू नये.” आणि त्याच्या खाली पंतप्रधान मोदींची सही आहे.

अलिबागमध्ये मार्च महिन्यातील धान्य वितरणादरम्यान लाभार्थ्यांची ‘बायोमेट्रिक’ ओळख पडताळणी करून या पिशव्यांचे वाटप करण्यात येत आहे. यामध्ये प्राधान्य गट आणि अंत्योदय गटातील लाभार्थ्यांचा समावेश आहे. रेशन दुकानदारांना या पिशव्यांचे तातडीने वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा पुरवठा विभागाकडून पिशव्या वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात येणार असून वितरण योग्य प्रकारे होत आहे की नाही याची तपासणी विशेष पथक करणार असल्याचे रेशन दुकानदारांनी सांगितले.

भाजपवर अपप्रचाराचा आरोप

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने सरकारी यंत्रणांमार्फत प्रचार सुरू केल्याचा आरोप केला जात आहे. याआधी राज्य सरकार गणेशोत्सव आणि दिवाळीच्या काळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे छायाचित्र असलेल्या पिशव्यांमध्ये ‘आनंदाचा शिळा’ वाटायचे. आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘मोदी सरकार हमी’च्या पिशव्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याकडे लक्ष दिले जात आहे.

शिधापत्रिकाधारक

  • वितरित केल्या जाणाऱ्या पिशव्यांमध्ये पंतप्रधान मोदींचा फोटो, मोफत धान्य देण्याचा संदेश आणि तळाशी त्यांची स्वाक्षरी आहे.
  • पुरवठा विभागाने लाभार्थ्यांना तात्काळ पिशव्यांचे वाटप करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पिशव्यांचे वाटप करण्यात येत आहे. – प्रवीण रणवरे, रास्त भाव दुकान चालक
  • लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने सरकारी यंत्रणांना हाताशी धरून बॅगमधून प्रचार सुरू केला आहे. लाभार्थ्यांना बळजबरीने पिशव्या वाटल्या जात आहेत, हा सत्तेचा दुरुपयोग आहे. -अजय उपाध्याय, तालुकाध्यक्ष, आप
  • रायगड जिल्ह्यात चार लाख 56 हजार 753 पिशव्या वितरणासाठी प्राप्त झाल्या आहेत. शासनाच्या सूचनेनुसार त्यांचे वितरण सुरू करण्यात आले आहे. – सर्जेराव सोनवणे, जिल्हा पुरवठा अधिकारी, रायगड.

हे पण वाचा>>> ऑनलाईन रेशन कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ?


इतरांना शेअर करा.......

My name is Umesh Gore. I am a blogger, youtuber and wordpress developer. I have more than 5 years of experience in this field.

Leave a Comment