विहिरीचा आकार गोलच का असतो,याचा तुम्ही कधी विचार केलाय का?


व्हॉट्सॲप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा

विहिरीचा आकार गोलच का असतो,याचा तुम्ही कधी विचार केलाय का? आपण सगळ्यांनीच गोल आकाराची आतापर्यंत विहीर पाहिली आहे. ती त्रिकोणी,चौकोनी का बरं बांधली जात नाही?
भूगर्भातलं पाणी काढण्यासाठी विहीर खोदली जाते. ग्रामीण भागात आपण विहिरी सर्रास बघू शकतो.

शहरात राहणाऱ्यांना या विहिरीचं विशेष आकर्षण असतं. पोहायला विहिरीच्या पाण्यात लवकर शिकता येतं आणि त्यात ते शिकल कि पोहण आयुष्यभर लक्षात राहतं, असं म्हणतात. विहिरीचा आकार गोलच का असतो आपण सगळ्यांनीच गोल आकाराची आतापर्यंत विहीर पाहिली आहे. , याचा विचार तुम्ही कधी केलाय का? ती चौकोनी किंवा त्रिकोणी का बरं बांधली जात नाही?

तुम्ही नेहमी गोल आकाराची विहीर पाहिली असेल. आपल्या पूर्वजांनीही विहिरी गोल आकाराच्याच बांधल्या आहेत; पण विहिरीचा आकार चौकोनी किंवा त्रिकोणी का बरं नव्हता, यावर तुम्ही कधी विचार केला आहे का?

तुम्हाला खरंच आश्चर्य वाटेल की, विहिरीचा आकार गोल असण्यामागे एक आश्चर्यकारक वैज्ञानिक कारण आहे.

हे पण वाचा : Maharashtra Police Bharti 2024 : राज्यात 17000 पोलीस पदांसाठी 05 मार्चपासून मोठी भरती.

विहिरीतलं पाणी पूर्वी रहाटाने काढलं जायचं. आता पंपाने उपसा केला जातो. पिण्यासाठी, शेतीसाठी तर काही ठिकाणी घरगुती वापरासाठीसुद्धा विहिरीतल्या पाण्याचा वापर केला जातो. विहिरीसाठी खड्डा खोदताना भूगर्भातल्या पाण्याच्या पातळीपर्यंत खोल खोदला जातो. तिथल्या जिवंत झऱ्यांमुळंच विहिरीला पाणी लागतं. त्यानंतर खड्ड्याच्या बाजूनं तिथं दगडाच्या भिंतीचं बांधकाम करतात.

का बांधतात गोल विहीर?

विहीर गोल आकारात बांधण्याचं एक कारण असं आहे, की गोल आकारातल्या विहिरीचा पाया खूप मजबूत असतो. विहिरीचे झरे आणि पाण्याचा दबाव गोल आकाराच्या विहिरीला कुठेही कोन नसल्यामुळं सगळीकडे एकसारखा राहतो. विहीर खचण्याचं प्रमाण त्यामुळे खूप कमी असतं.

तेच जर विहिरीचा आकार गोलऐवजी चौकोनी किंवा त्रिकोणी ठेवला, तर पाण्याचा दबाव चारही किंवा तिन्ही कोपऱ्यांमध्ये राहू शकतो. अशा परिस्थितीत विहीर दीर्घ काळ टिकू शकत नाही. तसंच ती खचण्याची भीती जास्त असते. त्यामुळंच विहीर गोल आकारातच जगभरात बांधली जाते

बांधायला सोपा गोल आकार – गोल आकारात विहिरीचं बांधकाम केल्यामुळंच वर्षानुवर्षं टिकत. त्यामध्ये तिच्या आकाराचं सगळ्यात मोठं योगदान आहे. या दोन्ही आकारांच्या तुलनेत गोलाकार विहीर बांधणं खूप सोपं असतं त्यामुळे चौकोनी किंवा त्रिकोणी आकारात विहीर न बांधण्याचं एक कारण असंही आहे. त्यामुळे आपल्या पूर्वजांनीसुद्धा ज्या विहिरी बांधल्या त्यांचा आकार गोल होता.

हे पण वाचा : Ayushman Bharat Card 2024 Apply Online : आयुष्मान भारत कार्ड 2024; नोंदणी, पात्रता, ऑनलाइन अर्ज संपूर्ण माहिती जाणून घ्या.

इतरांना शेअर करा.......