लाडकी बहिण योजना: महिलांचे पैसे थांबले, राम कदम संतप्त

Author Picture
By Umesh Gore Writer
Published On: July 12, 2025
लाडकी बहिण योजना: महिलांचे पैसे थांबले, राम कदम संतप्त

Ladki Bahin Yojana Paise Thambale Ram Kadam : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेअंतर्गत अनेक महिलांना सुरुवातीचे एक-दोन महिनेच आर्थिक लाभ मिळाला असून, त्यानंतर पैसे येणे थांबले असल्याची तक्रार समोर येत आहे. भाजप आमदार राम कदम यांनी ही बाब विधानसभेत उपस्थित करून सरकारकडे याचे स्पष्टीकरण मागितले.

राम कदम म्हणाले, “घाटकोपरमधील आमदार म्हणून मी स्वतः अनेक घरांमधून अर्ज भरून घेतले. पण आता अनेक महिला माझ्याकडे येऊन सांगत आहेत की, फक्त एका किंवा दोन महिन्यांचेच पैसे आले आणि त्यानंतर पैसे येणे थांबले आहे.”

त्यांनी पुढे म्हटले, “सर्व लाडक्या बहिणींना हे कळावे की त्यांचे पैसे का थांबले आहेत. यासाठी एक संकेतस्थळ असावे, जिथे नाव टाकल्यावर समजू शकेल की पैसे येणार आहेत का, आणि जर येत नसतील तर कारण काय आहे तेही कळले पाहिजे.”

या मुद्यावरून सभागृहात गदारोळ झाला. विरोधकांकडून ‘शेम शेम’च्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी राम कदम आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांच्यात वाद झाला. आदित्य ठाकरे यांनी कदम यांचे विधान पटलावरून हटवण्याची मागणी केली.

“या योजनेबाबत आम्ही आधीच फसवणुकीची शक्यता व्यक्त केली होती, तीच बाब आज कदम यांनी सभागृहात मांडली. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन,” असा टोला ठाकरे यांनी लगावला.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या विषयावर चर्चा वाढवू नये, असा हस्तक्षेप करून गोंधळ थांबवण्याचा प्रयत्न केला.

Umesh Gore
Writer

उमेश गोरे हे Goresarkar.in चे संस्थापक, लेखक आणि संपादक आहेत. ते केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या विविध सरकारी योजना, शेतीविषयक योजना, कृषी धोरणे, शेतकरी कल्याण, शिक्षण, शिष्यवृत्ती, सरकारी भरती आणि जनहिताच्या विषयांवर संशोधनाधारित माहिती मराठी भाषेत प्रकाशित करतात. प्रत्येक लेख तयार करताना अधिकृत सरकारी संकेतस्थळे, शासन निर्णय (GR), अधिसूचना, विभागीय परिपत्रके आणि संबंधित अधिकृत स्रोतांचा संदर्भ घेऊन माहितीची पडताळणी केली जाते. वाचकांना अर्ज प्रक्रिया, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, लाभ, अंतिम मुदत आणि महत्त्वाच्या अटी सोप्या व समजण्यास सुलभ भाषेत उपलब्ध करून देण्यावर त्यांचा भर असतो. Goresarkar.in चा उद्देश महाराष्ट्रातील शेतकरी, विद्यार्थी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत विश्वासार्ह, अद्ययावत आणि उपयुक्त माहिती पोहोचवणे हा आहे. प्रकाशित माहिती वेळोवेळी अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. अधिकृत निर्णयामध्ये बदल झाल्यास संबंधित लेख देखील अद्ययावत करण्यात येतात. या संकेतस्थळावरील माहिती ही केवळ जनजागृती आणि मार्गदर्शनाच्या उद्देशाने प्रकाशित केली जाते. कोणत्याही सरकारी योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहिती, नियम आणि अटींची पडताळणी करण्याचा सल्ला दिला जातो.… Read More

Related News
💬 Join WhatsApp