आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेत रु.५०० ने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. 500 प्रति महिना. झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थान हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूषवले होते.
sanjay gandhi योजना मानधन वाढ :-
या दोन्ही योजना सध्या रुपये मासिक आर्थिक सहाय्य प्रदान करतात. आता यामध्ये 500 रुपयांची वाढ होऊन ते सध्या ती रक्कम 1500 रुपायपर्यंत झाली आहे. सध्या एक अपत्य असलेल्या विधवा लाभार्थ्यांना 1 हजार 100 रुपये तर दोन अपत्य असलेल्या लाभार्थ्यांना 1 हजार 200 रुपये दिले जातात. त्यातही अनुक्रमे 400 आणि 300 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यातील सर्व दोन्ही योजनांमध्ये सध्या 40 लाख 99 हजार 240 लाभार्थी आहेत. पेन्शन वाढीसाठी 2400 कोटी रुपयांच्या अतिरिक्त तरतुदीलाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.