रेशन कार्ड कसे डाउनलोड करायचे:- नमस्कार मित्रांनो, आज आपण रेशन कार्ड ऑनलाईन कसे डाउनलोड करायचे याबद्दल माहिती घेणार आहोत. खाली दिलेल्या माहितीचा वापर करून तुम्ही तुमचे ऑनलाइन रेशन कार्ड डाउनलोड करू शकता. रेशन कार्ड कसे डाउनलोड करावे
1. ऑनलाइन रेशनकार्ड मिळविण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला अन्न व नागरी पुरवठा विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वेबसाइटवर जावे लागेल. त्याची लिंक खाली दिली आहे. तिथे क्लिक करा मग खाली दिसेल तशी वेबसाईट उघडेल.
फोटोमध्ये दिसल्याप्रमाणे, तुम्हाला इंग्रजी अक्षरे रिकाम्या जागेत दिसतात तशी टाईप करायची आहेत. त्याला कॅपच्या म्हणतात.
शिधापत्रिका डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
इथे क्लिक करा
2. त्यानंतर तुम्हाला Verify बटण ( हिरवे बटण ) वर क्लिक करावे लागेल, तेथे तुम्हाला तुमचा बारा अंकी शिधापत्रिका क्रमांक टाकावा लागेल आणि Verify बटणावर क्लिक करावे लागेल.
3. Verify बटणावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला तुमचे शिधापत्रिका दिसू लागेल. तेथे तुम्ही तुमचे रेशन कार्ड प्रिंट करा बटणावर क्लिक करून तुमचे रेशन कार्ड डाउनलोड करू शकता. तेथे तुम्हाला शिधापत्रिका क्रमांकही दिसेल.