JioFinance App : वित्तीय सेवा कंपनी Jio Financial Services ने गुरुवारी ‘Jio Finance App’ ची प्रायोगिक आवृत्ती लॉन्च करण्याची घोषणा केली.
JioFinance ॲप: पेटीएम पेमेंट्स बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले असताना रिलायन्स जिओने एक मोठे पाऊल उचलले आहे. पेटीएमची सेवा बंद करण्याची चर्चा असताना जिओने एक मोठी घोषणा केली आहे. पेटीएम, फोनपेला आव्हान देण्यासाठी रिलायन्स जिओने ‘जिओ फायनान्स ॲप’ची बीटा आवृत्ती लॉन्च केली आहे. यासह, आता तुम्ही UPI पेमेंट देखील करू शकाल. बुधवारी, कंपनीने Jio Finance ॲपची बीटा आवृत्ती लॉन्च करण्याची घोषणा केली.
मुकेश अंबानी यांच्या Jio Financial Services Limited ने बुधवारी Jio Finance ॲप लाँच केले. कंपनीने हे ॲप बीटा व्हर्जनमध्ये लॉन्च केले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची उपकंपनी असलेल्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये सांगितले की, जिओ फायनान्स ॲप एक अत्याधुनिक प्लॅटफॉर्म आहे. हे ॲप दैनंदिन वित्त आणि डिजिटल बँकिंगमध्ये क्रांती घडवून आणणार आहे. सोप्या शब्दात, तुम्ही पेटीएम, फोनपे इत्यादीद्वारे UPI पेमेंट करू शकाल, तुम्ही Jio Finance ॲपद्वारे देखील पेमेंट करू शकाल.
नवीन घर बांधण्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार 50 लाखांपर्यंत कर्ज, येथे पाहा कसे मिळवायचे कर्ज | Home Loan Up to 50 Lakh 2023
कंपनीने सांगितले की, या ॲपद्वारे ते लोकांना UPI, डिजिटल बँकिंग आणि म्युच्युअल फंडांवर कर्ज यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देणार आहेत. याद्वारे डिजिटल बँकिंग, UPI व्यवहार, बिल सेटलमेंट आणि इन्शुरन्स ॲडव्हायझरी सारखी कामे एकाच ठिकाणी करता येतील.
कंपनीने सांगितले की, या ॲपद्वारे ते लोकांना UPI, डिजिटल बँकिंग आणि म्युच्युअल फंडांवर कर्ज यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देणार आहेत. याद्वारे डिजिटल बँकिंग, UPI व्यवहार, बिल सेटलमेंट आणि इन्शुरन्स ॲडव्हायझरी सारखी कामे एकाच ठिकाणी करता येतील.
ॲपच्या मुख्य वैशिष्ट्यांमध्ये झटपट डिजिटल खाते उघडणे आणि ‘जिओ पेमेंट्स बँक खाते’ सुविधेसह सुव्यवस्थित बँक व्यवस्थापन समाविष्ट आहे. ग्राहकांच्या समाधानासाठी, ‘जिओ फायनान्स’ बीटा अर्थात प्रायोगिक तत्त्वावर लॉन्च करण्यात आला आहे. याअंतर्गत त्यात सुधारणा करण्यासाठी वापरकर्त्यांकडून सूचना मागवल्या जातील, असे कंपनीने म्हटले आहे. कंपनीने म्हटले आहे की, “आमचे उद्दिष्ट वित्ताशी संबंधित सर्व काही सोपे करणे आणि कर्ज, गुंतवणूक, विमा, पेमेंट आणि व्यवहार यांसारख्या सर्वसमावेशक ऑफरसह सर्व स्तरातील लोकांसाठी एकाच व्यासपीठावर आर्थिक सेवा अधिक पारदर्शक, परवडणारी बनवणे हे आहे.”