झेरॉक्स मशीन,स्प्रिंकलरसाठी समाजकल्याण विभागातर्फे १०० टक्के अनुदान


व्हॉट्सॲप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा

xerox machines sprinklers 100 percent subsidy : जिल्हा परिषदेमार्फत विविध प्रकारच्या योजनांसाठी अनुदान हे शंभर टक्क्यांमध्ये सुरू झालेले असून, ऑनलाइन अर्ज सुरू झालेले आहेत. समाजकल्याण विभागाच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना १०० टक्के अनुदानावर झेरॉक्स मशीन उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अनेकांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.

जिल्हा परिषद योजनेंतर्गत महाराष्ट्रामध्ये समाजकल्याण विभागामार्फत या योजना ऑनलाइन सुरू आहेत. ग्रामीण भागातील महिलांना व्यवसाय तसेच जीवनावश्यक वस्तू पुरविणे या अंतर्गत महिलांना पिठाची गिरणी, शिलाई मशीन, सोलार हीटर, तेल घाणा, मिरची कांडप यंत्र अशा सर्व वस्तूंचा पुरवठा जिल्हा परिषद योजनेमार्फत करण्यात येत आहे. योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन लाभार्थीना करण्यात आले आहे.

हे पण वाचा : Home Business Ideas for Women In Marathi : हा व्यवसाय करून महिला घरबसल्या महिन्याला कमवू शकतात 40 हजार रुपये

स्प्रिंकलरसाठी ९० टक्के अनुदान :

  • बहु भू-धारक शेतकऱ्यांना ९०% अनुदान देण्यात येणार आहे.

झेरॉक्स मशीनसाठी १०० टक्के अनुदान :

  • दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी झेरॉक्स मशीन १०० टक्के अनुदानावर उपलब्ध होते.

शिलाई मशीनसाठी १०० टक्के अनुदान

  • ज्या महिला आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत, त्यांना याचा लाभ मिळेल.

समाज कल्याण विभागातर्फे पात्र लाभार्थ्यांसाठी अनुदाना साहित्य-सामग्री उपलब्ध करून दिली जात आहे. त्यातून उंचावण्याचा प्रयत्न केला जात आहे.

निकष काय?

■ शिलाई मशीन योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी महिलेचे वय २० ते ४० वर्षे असणे अनिवार्य आहे. महिलेच्या पतीचे वार्षिक उत्पन्न १२ हजारांपेक्षा जास्त नसावे. अन्य योजनांसाठी लाभार्थीचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे किंवा साठ वर्षांपेक्षा कमी असावे.

■ याबाबतचे सरपंच, ग्रामसेवक यांचा दाखला घेणे आवश्यक आहे. जिल्हा परिषद पंचायत समितींतर्गत मागील तीन वर्षात लाभार्थ्यांनी लाभ घेतलेला नसावा याची खात्री मास्टर नोंदवहीवरून करून अर्ज पंचायत समितीकडे सादर करण्यात यावे.

१ एप्रिलनंतर करा अर्ज

■ या योजनांसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. २०२३-२४ च्या आर्थिक वर्षातील लाभार्थी निश्चित झाल्याने आता

२०२४-२५ या आर्थिक वर्षात अर्ज करता येणार आहे. त्यामुळे १ एप्रिलनंतर प्रस्ताव सादर करता येईल.

हे पण वाचा : Mahila Bachat Gat Loan : महिला बचत गट कर्ज योजना

इतरांना शेअर करा.......