फार्मा क्षेत्रातील आघाडीची कंपनी Zydus Lifesciences ने मार्च २०२६ तिमाहीत दमदार आर्थिक निकाल जाहीर करत बाजाराचे सर्व अंदाज फोल ठरवले आहेत. कंपनीने उत्कृष्ट नफ्यासोबतच १,१०३ कोटी रुपयांच्या शेअर बायबॅकची आणि लाभांशाची घोषणा केली आहे.
Table of Contents
तिमाही निकालात जबरदस्त कामगिरी
- कंपनीचा निव्वळ नफा वाढून १,२७३ कोटी रुपयांवर पोहोचला
- बाजाराचा अंदाज ९२५ ते १,००० कोटी रुपयांचा होता
- कंपनीचे एकूण उत्पन्न वाढून ७,५८७ कोटी रुपये झाले
- मजबूत विक्रीमुळे शेअर्समध्ये ५% पेक्षा अधिक तेजी
EBITDA आणि मार्जिन
- रिपोर्टेड EBITDA : २,५५४ कोटी रुपये
- EBITDA मार्जिन : ३३.७%
- ॲडजस्टेड EBITDA : १,९०९ कोटी रुपये
- ॲडजस्टेड मार्जिन : २५.२%
बायबॅकमध्ये गुंतवणूकदारांना फायदा
- कंपनी १,१५० रुपये प्रति शेअर दराने बायबॅक करणार
- सध्याच्या बाजारभावापेक्षा सुमारे ११.७% प्रिमियम
- एकूण ९६ लाख शेअर्सची खरेदी
- बायबॅकसाठी रेकॉर्ड डेट : २९ मे २०२६
एकनाथ शिंदेंना मोठा धक्का ? नाशिक बैठकीत बडा नेता गायब, शिवसेनेत नाराजीच्या चर्चांना उधाण
कंपनीला मोठा अपवादात्मक फायदा
- ‘झायडस व्हीटेक’ गुंतवणुकीतून १,०६८ कोटी रुपयांचा फायदा
- कायदेशीर सेटलमेंटमुळे ३९७.५ कोटी रुपयांचा खर्च
कंपनी काय करते ?
झायडस लाईफसायन्सेस ही जेनेरिक औषधे, APIs, बायोसिमिलर्स आणि वेलनेस प्रॉडक्ट्स तयार करणारी अग्रगण्य फार्मा कंपनी आहे. भारतासह अमेरिका आणि इतर जागतिक बाजारपेठांमध्ये कंपनीचे मजबूत नेटवर्क आहे.
एकंदरीत, दमदार तिमाही निकाल, आकर्षक बायबॅक आणि लाभांश घोषणेमुळे कंपनीने गुंतवणूकदारांचा विश्वास आणखी मजबूत केला आहे.
