Nuksan Bhrapai : राज्यातील शेतकऱ्यांना अवकाळी आणि अतिवृष्टीची मदत जाहीर; शासनाने दिली मान्यता


व्हॉट्सॲप ग्रुप           येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा

Nuksan Bhrapai : राज्यात अवकाळी आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी निधी वाटप करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. जानेवारी 2024 ते मे 2024 या कालावधीत अवकाळी हवामान आणि अतिवृष्टीमुळे राज्याचे नुकसान झाले, त्यामुळे निधीची मागणी करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार नुकसानभरपाईपोटी 596 कोटी 21 लाख 55 हजार रुपयांची रक्कम वाटप करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांना जानेवारी ते मे २०२४ दरम्यान अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीपासून दिलासा मिळणार आहे.

राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार या सहा महिन्यांत एकूण 2 लाख 17 हजार 690 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात ३ लाख ५४ हजार ७६५ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. नुकसान भरपाईची रक्कम डीबीटी पोर्टलद्वारे थेट बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.

पिकांचे नुकसान झाले आहे ? मग मोबाईल मधून तात्काळ करा पिकांची नुकसान भरपाई नोंदणी !

2 हेक्टरची मर्यादा वाढवून 3 हेक्टर करण्यात आल्याचेही शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना 3 हेक्टर मर्यादेपर्यंत पैसे मिळू शकणार आहेत. यामध्ये महसूल विभागाच्या 1 जानेवारी 2024 च्या निर्णयानुसार मदत दिली जाणार आहे. म्हणजे 3 हेक्टर मर्यादेत लागवडीयोग्य पिकांसाठी प्रति हेक्टर 13 हजार 600 रुपये, पीकांसाठी प्रति हेक्टर 27 हजार रुपये. बागायती पिके, बारमाही पिकांसाठी प्रति हेक्टर 36 हजार रुपये.

जानेवारी ते मे या कालावधीत राज्यातील विविध भागात पाऊस झाला. त्यामुळे रब्बी व उन्हाळी पिकांचे नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे पिके उद्ध्वस्त झाली. शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. शासनाने तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. शासनाने पंचनामा करण्याचे आदेश दिले मात्र ६ महिने उलटूनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही.

शेतकऱ्यांनी १५ ऑक्टोबरपर्यत ई-पिक पाहणी नोंदणी करण्याचे आवाहन…

त्यामुळे काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नितीन राऊत यांनी आपत्ती व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांना फैलावर घेतले. त्यावेळी पाटील यांनी 15 जुलैपर्यंत अतिवृष्टी आणि अवकाळी हवामानामुळे मिळालेली मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाईल, असे सांगितले होते. मात्र शासन निर्णयासाठी 2 ऑगस्ट ही तारीख निश्चित करावी लागली.

नाशिक विभागातील अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबाद, पुणे विभागातील सोलापूर, पुणे, अमरावती विभागात अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशीम आणि नागपूर विभागातील गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गडचिरोली, नागपूर जिल्हे. म्हणजेच या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. यामध्ये जानेवारी 2024 ते मे 2024 दरम्यान अतिवृष्टी, खराब हवामानाचा समावेश आहे.

जानेवारी महिन्यात खराब हवामानामुळे काही जिल्ह्यांचे नुकसान झाले तर एप्रिल महिन्यात काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली, अशा जिल्ह्यांसाठी मदत देण्यात आली आहे. खरीप हंगामापूर्वी मदतीची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र पंचनामा वेळेत पूर्ण झाला नाही, तर दुसरीकडे नुकसानीचे क्षेत्र अधिक असल्याचे बोलले जात आहे. यामुळे शासनाने कमी मदत दिल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यापूर्वी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात कृषी पिकांच्या मदतीसाठी राज्य सरकारने 144 कोटी रुपये आणि 2,109 कोटी रुपये मंजूर केले आहेत. मात्र अद्यापही मदतीची रक्कम त्यांच्या खात्यात पोहोचली नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.

घरगुती गॅस सिलिंडर अपघात झाल्यास मिळेल 50 लाख नुकसान भरपाई

इतरांना शेअर करा.......

My name is Umesh Gore. I am a blogger, youtuber and wordpress developer. I have more than 5 years of experience in this field.