Sant Savata Maharaj Kirtan Saptah Talegaon 2024 : संत शिरोमणी श्री सावता महाराज पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह 2024 मुक्काम पोस्ट तळेगाव तालुका जामनेर जिल्हा जळगाव येथे आयोजित केलेला होता आज कार्यक्रमाची सांगता झाली.
आजचे काल्याचे किर्तन हरिभक्त परायण शांताराम महाराज ( गादीवारस कडोजी महाराज संस्था शेंदुर्णी ) यांचे काल्याचे किर्तन सकाळी दहा वाजता संपन्न झाले. हे शेंदुर्णी येथील गावाचे संहिवासी आहेत. यांची कीर्तन सेवा श्री. श्रीकांत सुखदेव माळी यांच्याकडे आयोजित केली होती. महाप्रसादाचा जो कार्यक्रम आहे तो दुपारी एक ते चार वाजेपर्यंत संपन्न करण्यात आला.
या ठिकाणी या कार्यक्रमाचे मृदंगाचार्य :- हरिभक्त परायण अमृत महाराज कासली, हरिभक्त परायण बाबुराव सानप, विणेकरी :- हरिभक्त परायण कडूबा पालवे चोपदार :- हरिभक्त परायण सांडोबा वंजारी व हरिभक्त परायण श्याम सिंग राजपूत आणि गायनाचार्य :- हरिभक्त परायण शांताराम चौधरी , हरिभक्त परायण अर्जुन जाधव आणि हरिभक्त परायण सुरेश महाराज हार्मोनियम वादक :- हरिभक्त परायण मनोहर महाराज उबाळे सकाळचा हरिपाठ व काकडा :- हरिभक्त परायण एकनाथ माळी ,भिवसन माळी, गजानन चौधरी , युवराज माळी, समस्त श्रीराम भजनी मंडळी व महिला मंडळ तळेगाव यांच्याकडे सोपवण्यात आले होते.
या ठिकाणी समस्त महिला भजनी मंडळ शेळगाव तळेगाव , गजानन महाराज भक्त परिवार तळेगाव शेळगाव, समस्त भजनी मंडळ तळेगाव शेळगाव , तसेच सावरला ,जळांद्री, आमखेडा, शहापूर, कासली, सामरोद व टाकरखेडा व पंचक्रोशीतील भजनी मंडळी यांचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाचे व्यवस्थापन आणि संयोजन :- श्रीराम भजनी मंडळ व संत सावता तरुण मित्र मंडळ तळेगाव यांच्याकडे होते. अशाप्रकारे ही कार्यक्रमाची रूपरेषा होती. आणि अशाप्रकारे आनंदात या ठिकाणी संत शिरोमणी श्री सावता महाराज पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह साजरा करण्यात आला.