‘पुष्पा 2’ चित्रपट डिसेंबरमध्ये या तारखेला प्रदर्शित होणार

Author Picture
By Umesh Gore Writer
Published On: October 25, 2024
‘पुष्पा 2’ चित्रपट डिसेंबरमध्ये या तारखेला प्रदर्शित होणार
— Pushpa 2 release date update

Pushpa 2 release date update : ‘पुष्पा 2’ च्या घोषणेनंतर चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता होती. पण काही कारणास्तव या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. आता अखेर ‘पुष्पा २’ची रिलीज डेट निश्चित झाली आहे.

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर ‘पुष्पा 2’ ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 2021 मध्ये रिलीज झालेल्या पुष्पाने चाहत्यांना वेड लावले होते. तेव्हापासून प्रेक्षक या चित्रपटाच्या सिक्वेलची वाट पाहत होते. त्यामुळे ‘पुष्पा 2’ ची घोषणा झाल्यापासून चाहते खूप उत्सुक होते. पण काही कारणास्तव या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. आता अखेर ‘पुष्पा २’ची रिलीज डेट निश्चित झाली आहे.

‘पुष्पा 2’ संदर्भात एक मोठे अपडेट समोर आले आहे. याआधी अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ हा चित्रपट १५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली होती. त्यानंतर हा चित्रपट ६ डिसेंबरला प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले. पण, पुन्हा एकदा रिलीजची तारीख बदलण्यात आली, ज्यामुळे चाहते नाराज झाले. आता अखेर अल्लू अर्जुननेच ‘पुष्पा 2’ चित्रपटाची रिलीज डेट उघड केली आहे.

अल्लू अर्जुनने त्याच्या सोशल मीडियावर ‘पुष्पा 2’चे नवीन पोस्टर शेअर करून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. आता ‘पुष्पा 2’साठी प्रेक्षकांना अवघे काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. कारण, अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’ हा चित्रपट ५ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. त्यामुळे चाहतेही खूश आहेत. या चित्रपटाचा ट्रेलरही लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Umesh Gore
Writer

My name is Umesh Gore. I am a blogger, youtuber and wordpress developer. I have more than 5 years of experience in this field.… Read More

Related News
व्हाटसअप ग्रुप जॉईन करा