Maharashtra Rain Update : महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात 29 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे.
Maharashtra Rain Update : महाराष्ट्रातून पाऊस कमी झाल्यानंतरही, हवामानशास्त्रज्ञ के.एस. होसाळीकर यांनी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये २९ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबरदरम्यान हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
ऑक्टोबरच्या पहिल्या आणि दुस-या आठवड्यात जोरदार पाऊस झाल्यानंतर गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. हा ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा असून या आठवड्यात 29 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या तीन दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने हलका ते मध्यम पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. .
29 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, रायगड, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा जिल्ह्यात पावसामुळे पिवळा अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित जिल्ह्यांसाठी कोणताही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही.
30 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अहिल्यानगर, पुणे, सातारा, रत्नागिरी, रायगड, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, धाराशिव आणि यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली येथे पिवळा अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उर्वरित जिल्ह्यात कोणताही इशारा नाही. तसेच 31 ऑक्टोबर रोजी विदर्भातील केवळ यवतमाळ, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून अन्य जिल्ह्यांमध्ये कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.