Ladki Bahin Yojana 2024 : सरकारने लाडकी बहीण योजनेत दोन महत्त्वाचे बदल केले आहेत.. वयोमर्यादा वाढवण्यात आली आहे.. आता 65 वर्षांपर्यंतच्या महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकतात. यापूर्वी केवळ 21 वर्षे आणि 60 वर्षे पूर्ण केलेल्या महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येत होता… दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे शेतजमिनीची अटही रद्द करण्यात आली आहे. ज्यांच्याकडे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.. मात्र ही अट शिथिल करण्यात आली आहे.
लाडकी बहीण योजनेतील वयोमर्यादा ६० वर्षांवरून ६५ वर्षे करण्यात आली आहे. तसेच ज्या कुटुंबांकडे एकत्रित पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नव्हता. परंतु या अटतही आता सवलत देण्यात आली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी विधानसभेत केली घोषणा.