महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा मोठा निर्णय : CCMP कोर्स पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना अलोपॅथी प्रॅक्टिसची संधी

Author Picture
By Umesh Gore Writer
Published On: July 2, 2025
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा मोठा निर्णय : CCMP कोर्स पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना अलोपॅथी प्रॅक्टिसची संधी

Homeopathy Doctors Ccmp Registration Maharashtra Medical Council : राज्यातील ज्या होमिओपॅथी डॉक्टरांनी मॉडर्न फार्माकोलॉजी म्हणजेच CCMP कोर्स पूर्ण केला आहे, त्यांच्या नोंदणीस आता महाराष्ट्र राज्य वैद्यक परिषदेच्या अधिकृत नोंदणी पुस्तकात स्थान मिळणार आहे. या निर्णयामुळे सुमारे एक लाख डॉक्टरांना दिलासा मिळाला आहे.

याआधी होमिओपॅथी डॉक्टरांना अलोपॅथी औषधांचा वापर करून उपचार करण्यास बंदी होती. मात्र, राज्य सरकारने आधुनिक फार्माकोलॉजीचा एक वर्षाचा कोर्स पूर्ण केल्यानंतर त्यांना अलोपॅथी औषध वापरण्याची परवानगी दिली आहे.

IMA कडून संभाव्य विरोध

इंडियन मेडिकल असोसिएशनने या निर्णयाला यापूर्वी विरोध दर्शवला होता. तरीही 30 जून रोजी महाराष्ट्र वैद्यक परिषदेने अधिकृत परिपत्रक काढून या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं आहे. या पार्श्वभूमीवर डॉक्टरांना नोंदणीची संधी मिळाली असली, तरी या निर्णयाला पुढे जाऊन विरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नवीन गोष्टी शिकण्यासाठी अल्प वय उपयुक्त – डॉ. निखिल पांडे

बालवयात मेंदू अधिक लवचिक आणि शिकण्यासाठी तयार असतो. त्यामुळे नवीन भाषा, कौशल्ये आत्मसात करणं याच वयात तुलनेने अधिक सोपं असतं, असं नागपूरचे बाल मानसोपचार तज्ञ डॉ. निखिल पांडे सांगतात.

तज्ञांच्या मते, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच व्हावं, कारण क्लिष्ट संकल्पना मातृभाषेत अधिक सोप्या पद्धतीने समजून घेता येतात. तिसरी भाषा शिकवताना विद्यार्थ्यांवर ताण येऊ नये यासाठी ती भाषा हसतखेळत शिकवण्याचा पर्याय निवडावा. मात्र, फक्त तणावाच्या भीतीने नवीन भाषा शिकवूच नये हे योग्य नाही.

नवीन भाषा शिकणं हे कोणत्याही वयात फायदेशीर ठरतं. उतारवयातही यामुळे स्मृतीभ्रंशाचा धोका कमी करता येतो. त्यामुळे सतत काहीतरी नवीन शिकणं बुद्धीच्या दृष्टीने आरोग्यदायी आहे, असं मत तज्ञांनी व्यक्त केलं आहे.

Umesh Gore
Writer

My name is Umesh Gore. I am a blogger, youtuber and wordpress developer. I have more than 5 years of experience in this field.… Read More

Related News
व्हाटसअप ग्रुप जॉईन करा