CET 2025: अभियांत्रिकी, MBA, MCA प्रवेश वेळापत्रक जाहीर

Author Picture
By Umesh Gore Writer
Published On: July 2, 2025
CET 2025: अभियांत्रिकी, MBA, MCA प्रवेश वेळापत्रक जाहीर

Cet 2025 Engineering Mba Mca Admission Schedule : राज्यातील अभियांत्रिकी, तंत्रज्ञान पदवी, तसेच एमबीए आणि एमसीए अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (CET Cell) मार्फत ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी महत्त्वाच्या तारखा:

  • ऑनलाइन नोंदणी कालावधी: 28 जून ते 8 जुलै
  • कागदपत्र पडताळणी: 29 जून ते 9 जुलै
    (छाननी केंद्र किंवा सुविधा केंद्रांवर वेळ ठरवून जावे लागेल. ई-स्क्रुटिनीचा पर्यायही उपलब्ध आहे.)
  • तात्पुरती गुणवत्ता यादी: 12 जुलै
  • हरकती / आक्षेप नोंदवण्याचा कालावधी: 13 ते 15 जुलै
  • अंतिम गुणवत्ता यादी: 17 जुलै
  • नोंदणीची अंतिम तारीख (केवळ Non-CAP जागांसाठी): 8 जुलैनंतर केलेली नोंदणी आणि 9 जुलैनंतर पूर्ण झालेले अर्ज

छाननी केंद्रांची यादी आणि इतर तपशील अधिकृत वेबसाइटवर – https://cetcell.mahacet.org

एमबीए व एमसीए प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक:

  • ऑनलाइन अर्ज नोंदणी: 28 जून ते 8 जुलै
  • कागदपत्र पडताळणी: 30 जून ते 9 जुलै
    (ई-स्क्रुटिनी किंवा छाननी केंद्राचा पर्याय उपलब्ध)
  • तात्पुरती गुणवत्ता यादी: 12 जुलै
  • हरकती / सूचनांचा कालावधी: 13 ते 15 जुलै
  • अंतिम गुणवत्ता यादी: 17 जुलै

विद्यार्थ्यांनी वेळापत्रकाचे पालन करून आपली नोंदणी आणि पडताळणी वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Umesh Gore
Writer

उमेश गोरे हे Goresarkar.in चे संस्थापक, लेखक आणि संपादक आहेत. ते केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या विविध सरकारी योजना, शेतीविषयक योजना, कृषी धोरणे, शेतकरी कल्याण, शिक्षण, शिष्यवृत्ती, सरकारी भरती आणि जनहिताच्या विषयांवर संशोधनाधारित माहिती मराठी भाषेत प्रकाशित करतात. प्रत्येक लेख तयार करताना अधिकृत सरकारी संकेतस्थळे, शासन निर्णय (GR), अधिसूचना, विभागीय परिपत्रके आणि संबंधित अधिकृत स्रोतांचा संदर्भ घेऊन माहितीची पडताळणी केली जाते. वाचकांना अर्ज प्रक्रिया, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, लाभ, अंतिम मुदत आणि महत्त्वाच्या अटी सोप्या व समजण्यास सुलभ भाषेत उपलब्ध करून देण्यावर त्यांचा भर असतो. Goresarkar.in चा उद्देश महाराष्ट्रातील शेतकरी, विद्यार्थी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत विश्वासार्ह, अद्ययावत आणि उपयुक्त माहिती पोहोचवणे हा आहे. प्रकाशित माहिती वेळोवेळी अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. अधिकृत निर्णयामध्ये बदल झाल्यास संबंधित लेख देखील अद्ययावत करण्यात येतात. या संकेतस्थळावरील माहिती ही केवळ जनजागृती आणि मार्गदर्शनाच्या उद्देशाने प्रकाशित केली जाते. कोणत्याही सरकारी योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहिती, नियम आणि अटींची पडताळणी करण्याचा सल्ला दिला जातो.… Read More

Related News
💬 Join WhatsApp