जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शक अर्ज प्रक्रिया व कागदपत्रे

Author Picture
By Umesh Gore Writer
Published On: July 17, 2025
जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शक अर्ज प्रक्रिया व कागदपत्रे

Caste Validity Certificate Maharashtra Apply Online Documents : शैक्षणिक प्रवेशासाठी गरजेचे असलेले जात पडताळणी प्रमाणपत्र आता ऑनलाईन पद्धतीने मिळवणे सोपे झाले आहे. राज्य शासनाने ‘बार्टी’च्या माध्यमातून ही सुविधा सुरू केली असून, मे आणि जून 2025 मध्ये तब्बल 94,000 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 60,000 पेक्षा अधिक अर्ज निकाली काढण्यात आले आहेत.

जात वैधता प्रमाणपत्र का गरजेचे आहे?

एससी, एसटी, ओबीसी, एनटी आणि इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक सवलती मिळवण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र अत्यावश्यक आहे. या प्रमाणपत्राशिवाय कोणतीही शैक्षणिक फी माफ केली जात नाही.

जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी लागणारी कागदपत्रे:

  1. मूळ जात प्रमाणपत्र – सक्षम अधिकाऱ्याने दिलेले
  2. शाळा सोडल्याचा दाखला – अर्जदाराचा/वडिलांचा
  3. प्रवेश-निर्गम उतारा – मूळ प्रत किंवा साक्षांकित प्रत
  4. जातीचा पुरावा
    • SC/ST साठी – 10 ऑगस्ट 1950 पूर्वीचा पुरावा
    • OBC/NT साठी – 21 नोव्हेंबर 1961 पूर्वीचा पुरावा
    • 1967 पूर्वीचा पुरावा – अर्जदाराच्या वंशावळीतील सदस्याचा
  5. वंशावळ – वडिलांच्या बाजूकडील नातेवाईकांची माहिती
  6. रहिवासी दाखला – अर्जदाराचा
  7. ओळखपत्र – आधार कार्ड / पॅन कार्ड / इतर
  8. शपथपत्र – आवश्यक असल्यास नमुना ‘फ’ प्रमाणे
  9. इतर कागदपत्रे – उत्पन्नाचा दाखला, 7/12 उतारा इत्यादी

📌 अर्ज प्रक्रिया कशी आहे?

  • आपले सरकार पोर्टल किंवा जवळच्या सेतू केंद्रात ऑनलाईन अर्ज करा
  • सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  • अर्जाची स्थिती पोर्टलवर वेळोवेळी तपासता येते
  • योग्य कागदपत्रे असतील तर 15 ते 90 दिवसांत प्रमाणपत्र मिळते
  • त्रुटी असल्यास, समिती कागदपत्र पडताळणीसाठी बोलावू शकते

🖥️ ऑनलाईन अर्जासाठी संकेतस्थळ:

👉 https://castevalidity.mahaonline.gov.in
👉 https://aaplesarkar.mahaonline.gov.in

ही प्रक्रिया पारदर्शक असून, पूर्वीप्रमाणे लांबच्या रांगा आणि कार्यालयीन फेर्‍या टाळता येतात. विद्यार्थी आणि पालकांनी वेळेत अर्ज करून शैक्षणिक सवलतींचा लाभ घ्यावा.

Umesh Gore
Writer

My name is Umesh Gore. I am a blogger, youtuber and wordpress developer. I have more than 5 years of experience in this field.… Read More

Related News
व्हाटसअप ग्रुप जॉईन करा