Samaj Kalyan Vibhag scholarship 2024 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व आणि मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. 2017 पासून, शिष्यवृत्तीची रक्कम ‘DBT’ द्वारे लाभार्थी विद्यार्थ्याच्या आधारशी जोडलेल्या बँक खात्यात जमा केली जाते. परंतु, 2018-19 ते 2023-24 पर्यंत अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज विविध कारणांमुळे नाकारण्यात आले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व आणि मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. 2017 पासून, शिष्यवृत्तीची रक्कम ‘DBT’ द्वारे लाभार्थी विद्यार्थ्याच्या आधारशी जोडलेल्या बँक खात्यात जमा केली जाते. परंतु, 2018-19 ते 2023-24 पर्यंत अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज विविध कारणांमुळे नाकारण्यात आले. त्यांना आता शिष्यवृत्ती मिळणार असून त्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत ऑफलाइन अर्ज करायचा आहे.
विद्यार्थ्यांची आधार नोंदणी नसणे, सर्व्हरची तांत्रिक अडचण किंवा उत्पन्न मर्यादा आणि जात पडताळणी प्रमाणपत्रांचा अभाव यामुळे अनेकांना अर्ज करता आले नाहीत. याशिवाय महाविद्यालयांनी वेळेवर शुल्क निश्चित न केल्याने किंवा नियमित व पुरवणी परीक्षांच्या निकालांना उशीर झाल्यामुळे ‘महा डीबीटी’वर अनेक अर्ज फेटाळण्यात आले. अशा गरीब इच्छुक विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी समाज कल्याण विभागाने संधी दिली आहे. त्या विद्यार्थ्यांनी कॉलेजमार्फत सहाय्यक समाज कल्याण आयुक्त कार्यालयात ३० नोव्हेंबरपर्यंत ऑफलाइन अर्ज सादर करायचे आहेत. त्यानंतर कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही. सहाय्यक समाज कल्याण कार्यालयाकडे सादर केलेले अर्ज पडताळले जातील आणि 31 जानेवारी 2025 पर्यंत समाज कल्याण आयुक्तांकडे पाठवले जातील.
कॉलेज प्राचार्यावर ‘ही’ जबाबदारी!
ऑफलाइन मान्यतेसाठी प्राप्त झालेल्या प्रत्येक अर्जाच्या पडताळणीची जबाबदारी त्या महाविद्यालयाच्या प्राचार्याची असेल. त्यांना हे सुनिश्चित करावे लागेल की विद्यार्थ्याने यापूर्वी कोणत्याही शिष्यवृत्ती किंवा फ्रीशिपसाठी अर्ज केलेला नाही. मात्र, असा गैरप्रकार कोणी केल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी मुख्याध्यापकांची राहील, असेही सहाय्यक समाज कल्याण आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
विद्यार्थ्यांनी आमच्या कार्यालयात वेळेवर अर्ज करावेत
ज्यांनी 2018-19 ते 2023-24 या वर्षात शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला होता परंतु त्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाही, ते पुन्हा एकदा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. त्यांनी सर्व कागदपत्रे भरून महाविद्यालयांतून अर्ज केल्यास त्यांना शिष्यवृत्ती मिळेल. या कालावधीत विद्यार्थ्यांनी आमच्या कार्यालयात मुदतीत अर्ज करावेत.