Pradhan Mantri Awas Yojana 2024 : केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली असून, या योजनेतून गरीब कुटुंबांना घरे दिली जातात. आता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणचे नियम शिथिल करण्यात आले आहेत.
आतापर्यंत अनेकांनी घरांसाठी अर्ज केल्यावर सरकारी अधिकारी चौकशीसाठी आल्यावर त्यांना नियमांच्या आधारे अपात्र घोषित करायचे. आता सरकारने त्यात बदल केला आहे. यात बदल करून त्यांना घराचा लाभ मिळू शकेल.
सरकारची महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही 2015 मध्ये सुरू करण्यात आली होती. ज्या गरिबांकडे राहण्यासाठी घर नाही या योजनेअंतर्गत त्यांना घराचा लाभ देण्यात आला.
त्यांचे कुटुंब कच्चा-पक्क्या घरात राहायचे. या योजनेंतर्गत अनेकांना घराचा लाभ मिळाला आहे.
Table of Contents
ऑनलाईन रेशन कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ?
सरकारने काही दिवसांपूर्वी या योजनेच्या पात्रतेबाबतचे नियम शिथिल केले आहेत. आता ज्यांचे मासिक उत्पन्न १५ हजार रुपये आहे. घरी लँडलाईन फोन आहे. याशिवाय जर त्याच्याकडे बाईक आणि फ्रीज असेल तर तो या योजनेसाठी अर्ज करू शकतो.
यापूर्वी, अर्जदाराचे मासिक उत्पन्न 10,000 रुपये असल्यास आणि त्याच्याकडे दुचाकी असल्यास, तो या योजनेसाठी पात्र नव्हता. त्याचे नाव यादीतून काढून टाकले जाईल.
केंद्र सरकारने जुने नियम बदलले आहेत. लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी तीन हप्त्यांमध्ये 1 लाख 20 हजार रुपये मिळतात. यामध्ये पहिला हप्ता 70 हजार रुपये, दुसरा हप्ता 40 हजार रुपये आणि तिसरा हप्ता 10 हजार रुपये आहे.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, सरकारने गृहनिर्माण योजनेचे नियम बदलले आहेत. जर तुमच्याकडे बाईक, लँडलाईन फोन इत्यादी असेल तर तुम्ही अजूनही ग्रामीण भागातील घरांचा लाभ घेऊ शकता.