New National Cricket Academy : BCCI ने भारतीय खेळाडूंसाठी नवीन राष्ट्रीय क्रिकेट अकादमी स्थापन केली आहे. त्यात जागतिक दर्जाच्या सुविधा आहेत.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी एक मोठी घोषणा केली आहे. नवीन राष्ट्रीय अकादमीचे फोटो शेअर करताना त्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
राष्ट्रीय क्रिकेट अकादमी असल्यामुळे टीम इंडियाचे खेळाडू बाहेर पाऊस पडत असतानाही सराव करू शकतात. कारण तेथे इनडोअर खेळपट्टी तयार करण्यात आली आहे.
Table of Contents
IPL 2024 बक्षीस कोणत्या टीमला किती रक्कम…
जय शाह बीसीसीआय सचिव यांनी एक पोस्ट केली आहे. त्यात चित्रे शेअर केली आहेत. ते म्हणाले की, बीसीसीआयने नवीन राष्ट्रीय क्रिकेट अकादमीची स्थापना केली आहे. बंगळुरूमध्ये लवकरच त्याचे उद्घाटन होणार आहे. यात तीन जागतिक दर्जाचे स्टेडियम, 45 खेळपट्ट्या, इनडोअर क्रिकेट खेळपट्टी, ऑलिम्पिक मानक जलतरण तलाव, रिकव्हरी आणि क्रीडा विज्ञान सुविधा असतील.
बीसीसीआयची जुनी क्रिकेट अकादमी बेंगळुरूमध्ये आहे, नवीन राष्ट्रीय क्रिकेट अकादमीही बंगळुरूमध्ये स्थापन करण्यात आली आहे. अत्याधुनिक प्रशिक्षणासाठी विशेष केंद्र बांधण्यात आले आहे. भारतीय खेळाडू जखमी झाल्यास त्याच्या उपचाराचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
टीम इंडियाच्या क्रिकेटर्ससाठी बीसीसीआयने एक चांगलं पाऊल उचललं आहे. नवीन राष्ट्रीय क्रिकेट अकादमीची स्थापना हा त्याचाच एक भाग आहे. बाहेर पाऊस पडला तरी खेळाडूंना इनडोअर खेळपट्टीवर सराव करता यावा यासाठी इनडोअर खेळपट्टी बांधण्यात आली आहे.