पोलिस भरतीच्या मैदानी चाचण्यांची सोमवारपासून प्रारंभ होण्याची शक्यता; ग्राउंडची तयारी पूर्ण

Author Picture
By Umesh Gore Writer
Published On: June 7, 2024
पोलिस भरतीच्या मैदानी चाचण्यांची सोमवारपासून प्रारंभ होण्याची शक्यता;  ग्राउंडची तयारी पूर्ण

Police Bharti New Update : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे तब्बल चार महिने रेंगाळलेली राज्यभरातील पोलिस भरतीच्या प्रक्रियेला आता वेग येणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे तब्बल चार महिने रेंगाळलेली राज्यभरातील पोलिस भरतीच्या प्रक्रियेला आता वेग येणार आहे. लोकसभा निवडणुकीची धामधूम संपताच, पोलिस भरतीसाठीच्या मैदानी चाचणीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे. येत्या सोमवार (ता.१०) पासून शहर आयुक्तालयाच्या कवायत मैदानावर पोलिस भरतीसाठीच्या उमेदवारांची मैदानी चाचणी सुरु होण्याची शक्यता आहे. (Nashik police recruitment )

शहर पोलिस आयुक्तालयातील रिक्त ११८ पोलिस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली भरती प्रक्रिया होते आहे. यासाठी गेल्या डिसेंबर महिन्यापासून उमेदवारांना अर्ज मागविले होते. मुदतवाढ देत फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करून घेतले. मात्र याच दरम्यान, लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली. त्यामुळे पोलिस भरतीची प्रक्रिया सुमारे चार महिने रेंगाळली होती.

ST महामंडळामध्ये 256 जागेसाठी मेगाभरती , असा करा अर्ज!

मात्र, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्याला आता प्रारंभ होत आहे. मुख्यालयाचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्या आदेशान्वये, मैदानी चाचणीच्या तयारीला सुरवात केली आहे. शरणपूर रोडवरील शहर पोलिस कवायत मैदानावर पोलिस भरतीच्या मैदानी चाचणी होणार आहे.

यासंदर्भातील अंतिम नियोजन सुरू असून, येत्या १० तारखेपासून प्रत्यक्ष मैदानी चाचणीला प्रारंभ होण्याची शक्यता आहे. यासाठी उमेदवारांना हॉल तिकीट आणि ई-मेल, मोबाईल संदेशाद्वारे सूचना कळविली जाणार आहे. त्यानुसार, उमेदवारांची मैदानी चाचणीला पाचारण केले जाईल.

बारावी पास नंतर ‘हे’ टॉप करिअर पर्याय…

मैदानी चाचणीतील शारीरिक पात्रता

  • मैदानी चाचणीत धावणे,
  • गोळाफेक व शारीरिक पात्रता मोजणी
  • पुरुष उमेदवारांची उंची १६५ सेमी,
  • छाती न फुगवता ७९ सेमी तर फुग ८४ सेमी
  • महिला उमेदवारांना १५५ सेमी उंची
  • तृतीयपंथी उमेदवारांनी ओळख महिला व पुरुष ज्या गटात दिली असेल, त्यानुसार चाचणी

११८ जागांसाठी आलेले अर्ज

“नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातील रिक्त ११८ जागांसाठी एकूण ८ हजार ३२५ अर्ज आलेले आहेत. यात पुरुष गटासाठी ६ हजार ७५ तर, महिला गटासाठी २ हजार २४८ अर्जाचा समावेश आहे. तसेच, तृतीयपंथीयांचे दोन अर्जही आहेत.”

“पोलिस भरतीसाठीच्या मैदानी चाचण्यांसाठी कवायत मैदानावर पूर्वतयारी सुरू केली आहे. अद्याप निश्चित तारीख नसली तरी येत्या आठवड्यात प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.” – चंद्रकांत खांडवी, पोलिस उपायुक्त, मुख्यालय.

पोलीस भरतीसाठी नवीन नियम, या नव्या अटीमुळे उमेदवारांचे होणार मोठ नुकसान!

Umesh Gore
Writer

My name is Umesh Gore. I am a blogger, youtuber and wordpress developer. I have more than 5 years of experience in this field.… Read More

Related News
व्हाटसअप ग्रुप जॉईन करा