Modi Diwali Gift Gst Sudharana 2025 : भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीपूर्वीच देशवासियांना मोठी भेट दिली. या दिवाळीत जीएसटीमध्ये मोठा बदल केला जाणार आहे.
आज भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन आहे. या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरात प्रचंड उत्साह आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर बाराव्यांदा तिरंगा फडकावला. यावेळी त्यांनी देशवासियांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी देशवासियांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. यावेळी दिवाळीपूर्वीच नरेंद्र मोदींनी देशवासियांना मोठी आनंदाची बातमी दिली आहे.
Table of Contents
दिवाळीपूर्वी भेट
“या वर्षी मी तुम्हा सर्वांसाठी दिवाळी दुप्पट करण्यासाठी काम करेन. या दिवाळीत मी देशातील जनतेला सर्वात मोठी भेट देईन. गेल्या ८ वर्षात आम्ही जीएसटीमध्ये मोठे सुधारणा केल्या आहेत. आम्ही देशभरात कर कमी केले आहेत. आम्ही करात सुधारणा केल्या आहेत. आता ८ वर्षांनंतर, त्याचा आढावा घेण्याची वेळ आली आहे. यानंतर, आम्ही एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली. आम्ही त्यांच्याशी या मुद्द्यांवर चर्चा केली. आम्ही राज्य सरकारांशीही चर्चा केली आणि आता आम्ही पुढील पिढीच्या जीएसटी सुधारणा आणत आहोत”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
कर कमी केले जातील
“या वर्षी दिवाळीपूर्वी या नवीन जीएसटी सुधारणा तुमच्यासाठी एक भेट असतील. यामुळे सामान्य माणसासाठी कर मोठ्या प्रमाणात कमी होतील. यामुळे जीएसटीचे दर कमी होतील. हे लघु आणि मध्यम उद्योगांसाठी सर्वात फायदेशीर ठरेल”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची शक्यता
दरम्यान, दिवाळीपूर्वी नरेंद्र मोदी यांनी केलेल्या या घोषणेमुळे देशवासीयांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. आता सर्वांच्या नजरा जीएसटीमधील बदलांनंतर दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किमती कमी होतील का, वस्तू स्वस्त होतील का आणि महागाईपासून दिलासा मिळेल का याकडे लागल्या आहेत. तथापि, या घोषणेनंतर अर्थव्यवस्थेलाही गती मिळण्याची शक्यता आहे.