YouTube New Policy Update 2025 : युट्यूबवर काम करणाऱ्या अनेक कंटेंट क्रिएटर्ससाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. आता युट्यूबच्या नवीन धोरणामुळे अनेकांना त्यांच्या कमाईवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
युट्यूबने स्पष्ट केले आहे की, 15 जुलैपासून त्यांच्या पार्टनर प्रोग्राममध्ये एक नवा नियम लागू होणार आहे. या अंतर्गत, सारखीच शैली असलेले, पुनरावृत्ती करणारे आणि एआयच्या मदतीने तयार केलेले व्हिडीओ हे कमाईसाठी अपात्र ठरवले जाणार आहेत.
कोणत्या प्रकारचा कंटेंट होईल डिओनटायझ?
- सतत सारखाच टेम्प्लेट वापरून तयार केलेले व्हिडीओ
- केवळ व्ह्यूज मिळवण्यासाठी बनवलेले कंटेंट (Clickbait थंबनेल, कमी मेहनत)
- एआयने जनरेट केलेले व्हिडीओ, ज्यात मानवी स्पर्श किंवा इनपुट नाही
- शैक्षणिक किंवा मनोरंजनमूल्य नसलेले कंटेंट
युट्यूबने सांगितले आहे की अशा प्रकारच्या “मास प्रोड्यूस्ड” व्हिडीओंवर आता कठोर कारवाई केली जाईल. चॅनेलवर कमाई रोखली जाऊ शकते किंवा तो युट्यूब पार्टनर प्रोग्राममधूनही वगळला जाऊ शकतो.
युट्यूबच्या धोरणात भर काय?
YouTube ने नेहमीच ओरिजिनल कंटेंटला महत्त्व दिलं आहे. यामुळे, आता जे निर्माते इतरांचे व्हिडीओ वापरतात – ते ही मोठ्या बदलांशिवाय – त्यांच्यावरही निर्बंध येणार आहेत. जर दुसऱ्याचा कंटेंट वापरला तर तो पूर्णपणे नवीन रूपात सादर होणं आवश्यक आहे.
कंटेंट क्रिएटर्ससाठी सल्ला:
- तुमचा कंटेंट स्वतः तयार करा
- शिक्षण, माहिती किंवा मनोरंजन देणाऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा
- AI वापरत असाल तरी त्यात मानवी टच, स्क्रिप्ट, व्हॉइसओव्हर आणि क्रिएटिव्हिटी जोडा
नवीन धोरण हे YouTube वर दर्जेदार आणि युनिक कंटेंट वाढवण्यासाठीचे पाऊल आहे. त्यामुळे जर तुम्ही खरोखर मेहनत घेऊन, नवीन कल्पना वापरून व्हिडीओ बनवत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी सकारात्मक आहे.