शेतकऱ्यांना मिळणाऱ्या फार्मर आयडी क्रमांकाचा काय फायदा होईल? सर्व शेतकरी आधार क्रमांकाशी जोडले जातील

Author Picture
By Umesh Gore Writer
Published On: November 30, 2024
शेतकऱ्यांना मिळणाऱ्या फार्मर आयडी क्रमांकाचा काय फायदा होईल? सर्व शेतकरी आधार क्रमांकाशी जोडले जातील
— Link Aadhaar to Farmer ID Number

Link Aadhaar to Farmer ID Number : राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आधार क्रमांक आणि पॅनकार्डप्रमाणेच शेतकरी ओळखपत्र क्रमांक ( Farmer ID Number ) देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महसूल व कृषी विभागाच्या वतीने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचे आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक व कृषीविषयक सर्व माहिती संकलित करण्याचे काम हाती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्यात कृषी विभागाच्या शंभरहून अधिक योजना असून, त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. योजनांच्या अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. यासाठी शेतकऱ्यांना त्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक करावे लागेल. शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती कृषी विभागाकडे आहे. मात्र, उर्वरित शेतकऱ्यांची आकडेवारी सरकारकडे नाही. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची संख्या, त्यांच्या नावावर असलेली एकूण जमीन, त्यांच्या बँक खात्याचा तपशील आणि आधार क्रमांकाच्या आधारे त्यांना शेतकरी ओळखपत्र क्रमांक देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

अंमलबजावणीसाठी समित्या : हे काम महसूल विभागाकडे सोपविण्यात आले आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य, विभागीय, जिल्हा आणि तालुकास्तरीय समित्या स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

या समित्यांमध्ये कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

Umesh Gore
Writer

My name is Umesh Gore. I am a blogger, youtuber and wordpress developer. I have more than 5 years of experience in this field.… Read More

Related News
व्हाटसअप ग्रुप जॉईन करा