आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृह भत्त्यात मोठी वाढ | नवीन दर जाहीर


व्हॉट्सॲप ग्रुप           येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा

Vasatigurh Bhatta Vadh 2025 : राज्यातील शासकीय आदिवासी वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध भत्त्यांच्या रकमेत अखेर वाढ मिळाली आहे. अनेक वर्षांनंतर महागाईचा विचार करून ही सुधारणा करण्यात आली असून, ती २४ जून रोजी पार पडलेल्या बैठकीत मंजूर करण्यात आली.

शासन निर्णय नुकताच जाहीर
आदिवासी विकास विभागाने हा निर्णय अधिकृतपणे प्रसिद्ध केला असून, तो तत्काळ लागू होणार आहे. आठवीपासून उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात निवासासोबतच दरमहा आर्थिक सहाय्य दिलं जातं. मात्र गेल्या काही वर्षांत या भत्त्यांमध्ये वाढ करण्यात आलेली नव्हती.

नवीन वाढीव रक्कम पुढीलप्रमाणे आहे:

🔸 निर्वाह भत्ता

  • विभागीय वसतिगृह: ₹८०० → ₹१५००
  • जिल्हास्तर वसतिगृह: ₹६०० → ₹१३००
  • तालुका/ग्रामीण वसतिगृह: ₹५०० → ₹१०००

🔸 साहित्य खरेदी भत्ता

  • ८वी ते १०वी: ₹३२०० → ₹४५००
  • ११वी, १२वी व पदविका अभ्यासक्रम: ₹४००० → ₹५०००
  • पदवी अभ्यासक्रम: ₹४५०० → ₹५७००
  • वैद्यकीय/अभियांत्रिकी: ₹६००० → ₹८०००

🔸 आहार भत्ता

  • अ, ब, क महापालिका व विभागीय वसतिगृह: ₹३५०० → ₹५०००
  • जिल्हास्तर वसतिगृह: ₹३००० → ₹५०००

या निर्णयामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना होणाऱ्या खर्चाचा भार कमी होईल, तसेच शैक्षणिक प्रवास अधिक सुलभ होईल अशी अपेक्षा आहे.

इतरांना शेअर करा.......

My name is Umesh Gore. I am a blogger, youtuber and wordpress developer. I have more than 5 years of experience in this field.