जळगावच्या वाघूर नदीला पूर; जिल्हा प्रशासनाने केले सतर्क राहण्याचे आवाहन

Author Picture
By Umesh Gore Writer
Published On: September 4, 2024
जळगावच्या वाघूर नदीला पूर; जिल्हा प्रशासनाने केले सतर्क राहण्याचे आवाहन
— vaghur nadi pur news

Waghur river : वाघूर नदीच्या पाणलोट क्षेत्रात अजिनाथ पर्वतराजीतून गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वाघूर नदीला पूर आला असून, जामनेर तालुक्यातील वाकोद परिसरातील ४ गावे जलमय झाली आहेत. पुराच्या पाण्यामुळे सर्वच गावांचे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, अतिरिक्त जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी बाधित गावांना भेटी देऊन पाहणी केली व मदत कार्याला गती देण्याचे निर्देश दिले.

वाघूर नदीच्या परिसरातील सर्व गावांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले असून पुराच्या पाण्यामुळे कोणतीही जीवित वा पशुधनाची हानी झाली नसून आर्थिक नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त गावांना आवश्यक ती मदत देण्यासाठी तहसीलदार जामनेर घटनास्थळी उपस्थित असून नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत करत आहेत. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाला (एसडीआरएफ) मदतकार्यासाठी पाचारण करण्यात आले असून त्यांच्याकडून आवश्यक मदतकार्य केले जात आहे. याशिवाय जिल्ह्यातील भुसावळ, चोपडा इ. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची (SDRF) एक टीमही मदतकार्यासाठी घटनास्थळी तैनात करण्यात आली आहे.

तापी व वाघूर नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हतनूर व वाघूर धरणातील पाणीपातळीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यकतेनुसार विसर्ग नदीत पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी तापी व वाघूर नदीपात्र परिसरात जाऊ नये व गुरे घेऊन जाऊ नये. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष क्रमांक 02572217193 वर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झाले, असा करा क्लेम

Umesh Gore
Writer

My name is Umesh Gore. I am a blogger, youtuber and wordpress developer. I have more than 5 years of experience in this field.… Read More

Related News
व्हाटसअप ग्रुप जॉईन करा