Udyogini Yojana 2024 : केंद्र सरकार महिलांसाठी विविध योजना राबवत आहे. महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी सरकार या योजना राबवते. आता आत्मनिर्भर भारत अंतर्गत महिलांसाठी उद्योगिनी योजना सुरू करण्यात आली आहे.
महिलांना व्यवसायात यायचे असेल, तर महिला उद्योग निधी योजना मुद्रा योजना, भारतीय महिला व्यावसायिक बँक कर्ज योजना, अन्नपूर्णा योजना, स्त्री शक्ती पॅकेज इत्यादी योजना आहेत. यापैकी एक म्हणजे उद्योगिनी योजना. ही योजना बँका आणि मान्यताप्राप्त कर्ज देणाऱ्या संस्थांमार्फत राबविली जाते.Udyogini Yojana 2024
उद्योगिनी योजना म्हणजे काय? | Udyogini Yojana 2024
महिला सक्षमीकरणासाठी ही योजना व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी असून या योजनेअंतर्गत तीन ते पाच लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध आहे. या व इतर योजनांच्या माहितीसाठी महिला अर्जदाराने आवश्यक कागदपत्रांसह संबंधित बँकेला भेट द्यावी.
Mahila Bachat Gat Loan : महिला बचत गट कर्ज योजना
निकष तपासून योजनेद्वारे अर्ज करावा लागेल. या योजनेंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दिव्यांग महिला व इतर महिलांना कमी दरात व्याजमुक्त कर्ज देण्याची तरतूद आहे.
कोणत्या व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध आहे?
या योजनेंतर्गत बांगडी निर्मिती, ब्युटी पार्लर, चादर, टॉवेल निर्मिती, नोटबुक फॅक्टरी, कॉफी, चहा पावडर व्यवसाय, मसाला उद्योग, कापूस धागा उत्पादन, रोपवाटिका, कापड, डेअरी इत्यादी उद्योगांसाठी कर्जाची तरतूद आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते निकष आहेत?
इच्छुक महिला लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न 1.5 लाखांपेक्षा कमी असावे, 18 ते 45 वर्षे वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. सरकारकडून कर्जावर 30 टक्के अनुदानाची तरतूद आहे.