राज्यातील वीज ग्राहक आता स्मार्ट होणार आहेत. ग्राहकांच्या वीज बिलातील अनियमितता दूर करण्यासाठी महावितरणने 2 कोटी 37 लाख वीज ग्राहकांच्या घरात स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वीजवापराचे स्वयंचलित अचूक मीटर रीडिंग घेतल्याने ग्राहकांना त्यांनी वापरलेल्या विजेचे योग्य बिल मिळेल. हे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी महावितरणने चार एजन्सी नेमल्या असून, ते १५ मार्चपासून सुरू होणार आहेत.
महावितरणचे राज्यभरात तीन कोटींहून अधिक वीज ग्राहक आहेत. कृषी पंप वगळता सर्व वीज ग्राहकांच्या वीजवापराचे मीटर रीडिंग दरमहा घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी वीज कर्मचाऱ्याला संबंधित ग्राहकाच्या वीज मीटरच्या ठिकाणी जाऊन मीटरचे रिडिंग घेणे, बिल तयार करून ग्राहकाला पाठवणे आवश्यक आहे. तसेच मीटर रीडिंग घेताना संबंधित कर्मचाऱ्यांकडून चूक झाल्यास ग्राहकाला चुकीचे बिल येते व ते दुरुस्त करून घेण्यासाठी ग्राहकाला वीज कंपनीच्या कार्यालयात जावे लागते. त्यामुळेच महावितरणने कोल्हापूर वगळता इतर वीजग्राहकांच्या घरी स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
किंमत आठ-दहा हजार रुपये
हे स्मार्ट मीटर महावितरणच्या चार कंपन्यांच्या माध्यमातून बसविण्यात येणार आहेत. स्मार्ट मीटरची किंमत सुमारे 8 ते 10 हजार रुपये आहे. त्यामुळे एकूण 2 कोटी 42 लाख मीटर्ससाठी सुमारे 25 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
हे पान वाचा : Jio Prime 5G : Jio घेऊन येत आहे गरीबांसाठी 5G स्मार्टफोन , त्यांना वर्षभर मोफत कॉलिंग आणि फ्री इंटरनेट मिळेल