शिलाई मशीन योजना 2025 : महिलांसाठी 90% अनुदानावर मशीन

Author Picture
By Umesh Gore Writer
Published On: July 18, 2025
शिलाई मशीन योजना 2025 : महिलांसाठी 90% अनुदानावर मशीन
— Silai Machine Anudan Yojana 2025

Silai Machine Anudan Yojana 2025 : महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद जालना यांच्या माध्यमातून ग्रामीण महिलांसाठी सुवर्णसंधी! शिलाई मशीनसाठी ९० टक्के अनुदान मिळवून तुमचा शिवणकाम व्यवसाय आजच सुरु करा.

अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३० जुलै २०२५

योजनेचा उद्देश:

ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अनुसूचित जातीतील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना राबवली जात आहे. शासकीय मदतीने शिलाई मशीन मिळवून महिला स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकतात.

कोण पात्र आहेत?

  • अनुसूचित जातीतील महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल.
  • अर्जदार महिला ही महाराष्ट्र राज्यातील जालना जिल्ह्याची रहिवासी असावी.

अनुदान किती?

  • शासकीय अनुदान: ९०%
  • लाभार्थी योगदान: १०% (गांरटीपत्र आवश्यक)

अर्ज प्रक्रिया:

  1. ऑनलाईन अर्ज सादर करा.
  2. त्यानंतर अर्ज PDF स्वरूपात डाउनलोड करून त्याची प्रिंट घ्या.
  3. महिला व बालकल्याण विभाग, जालना येथे आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन सादर करा.

लागणारी कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट साइज फोटो
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • १०% रक्कम भरण्याचे हमीपत्र

अर्जासोबत जोडावयाची प्रमाणपत्रे:

  • ग्रामसेवकाचे योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र
  • शिलाई मशीन हस्तांतरण न करण्याचे हमीपत्र
  • कुटुंबातील कोणीही शासकीय सेवेत नाही, याचे प्रमाणपत्र

विशेष सूचना:

  • ही योजना सध्या जालना जिल्ह्यात सुरु आहे. इतर जिल्ह्यांसाठी तारीखा वेगळ्या असू शकतात.
  • आपल्या जिल्ह्यातील महिला व बालकल्याण विभागाशी संपर्क साधून अधिक माहिती घ्या.

अर्ज करण्यासाठी लिंक:

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा

ऑफलॉईन अर्ज कसा करावा

ग्रामीण भागातील महिलांना विविध साहित्य पुरविणे या योजने अंतर्गत शिलाई मशीन करिता करावयाचा अर्जाचा नमुना पी डी एफ फाईल डाऊनलोड करून भरावी व संबंधित तालुका सी डी पी ओ कार्यालयात भरून जमा करावी

ऑफलॉईन अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

ही योजना महिलांसाठी रोजगाराचा उत्तम पर्याय ठरू शकते. शिवणकाम व्यवसाय ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर विकसित होऊ शकतो. त्यामुळे आजच अर्ज करा आणि स्वावलंबी व्हा.

Umesh Gore
Writer

उमेश गोरे हे Goresarkar.in चे संस्थापक, लेखक आणि संपादक आहेत. ते केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या विविध सरकारी योजना, शेतीविषयक योजना, कृषी धोरणे, शेतकरी कल्याण, शिक्षण, शिष्यवृत्ती, सरकारी भरती आणि जनहिताच्या विषयांवर संशोधनाधारित माहिती मराठी भाषेत प्रकाशित करतात. प्रत्येक लेख तयार करताना अधिकृत सरकारी संकेतस्थळे, शासन निर्णय (GR), अधिसूचना, विभागीय परिपत्रके आणि संबंधित अधिकृत स्रोतांचा संदर्भ घेऊन माहितीची पडताळणी केली जाते. वाचकांना अर्ज प्रक्रिया, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, लाभ, अंतिम मुदत आणि महत्त्वाच्या अटी सोप्या व समजण्यास सुलभ भाषेत उपलब्ध करून देण्यावर त्यांचा भर असतो. Goresarkar.in चा उद्देश महाराष्ट्रातील शेतकरी, विद्यार्थी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत विश्वासार्ह, अद्ययावत आणि उपयुक्त माहिती पोहोचवणे हा आहे. प्रकाशित माहिती वेळोवेळी अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. अधिकृत निर्णयामध्ये बदल झाल्यास संबंधित लेख देखील अद्ययावत करण्यात येतात. या संकेतस्थळावरील माहिती ही केवळ जनजागृती आणि मार्गदर्शनाच्या उद्देशाने प्रकाशित केली जाते. कोणत्याही सरकारी योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहिती, नियम आणि अटींची पडताळणी करण्याचा सल्ला दिला जातो.… Read More

Related News
💬 Join WhatsApp