बँक तुमचं काम करत नाही? काळजी नको! RBI ने दिली आहे तक्रार नोंदवण्याची सोय


व्हॉट्सॲप ग्रुप           येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा

RBI Bank Takrar Ombudsman Online : आजच्या डिजिटल युगात जवळपास प्रत्येक जण बँकिंग सेवा वापरत आहे – मग ते बचत खाते असो, एटीएम, मोबाईल बँकिंग की कर्ज. या सर्व सेवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या नियमानुसार चालतात. मात्र, अनेकदा काही बँका ग्राहकांचे काम वेळेत करत नाहीत, अडवणूक करतात किंवा सेवा देण्यात हलगर्जीपणा करतात.

अशा प्रसंगी, RBI ने ग्राहकांसाठी एक महत्वाची सोय उपलब्ध करून दिली आहे – बँकिंग लोकपाल योजना (Banking Ombudsman Scheme). यामार्फत ग्राहक आपली तक्रार ऑनलाइन किंवा ऑफलाइन नोंदवू शकतात.

काय आहे बँकिंग लोकपाल?

बँकिंग लोकपाल ही RBIची एक योजना आहे, जी ग्राहकांच्या बँकिंग संबंधित तक्रारींचे निवारण करण्यासाठी कार्यरत आहे. या योजनेत नोंदवलेली तक्रार ३० दिवसांच्या आत सोडवली जाते.

कोणकोणत्या तक्रारी करू शकता?

तुम्ही खालीलप्रमाणे तक्रारी बँकिंग लोकपालकडे करू शकता:

  • विनाकारण खाते बंद करणे
  • कर्जावर चुकीचा किंवा जास्त व्याजदर आकारणे
  • एटीएम सेवा बिघडलेली असणे
  • मोबाईल बँकिंग अडचणी
  • चेक क्लिअर होण्यास उशीर
  • क्रेडिट कार्डसंबंधी समस्या
  • बँकेच्या सेवा अपुऱ्या किंवा त्रासदायक असणे

तक्रार कशी करावी?

  1. https://cms.rbi.org.in या RBI च्या तक्रार पोर्टलवर जा.
  2. File a Complaint’ या पर्यायावर क्लिक करा.
  3. तुमची माहिती भरून ऑनलाइन फॉर्म सबमिट करा.
  4. तक्रार दाखल केल्यानंतर तुम्हाला Complaint Reference Number मिळेल, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या तक्रारीचा स्टेटसही ट्रॅक करू शकता.

टीप: तक्रार करण्याआधी, संबंधित बँकेशी संपर्क करून ३० दिवसांपर्यंत प्रतिसादाची वाट पहा. त्यानंतरही उत्तर न मिळाल्यासच RBI च्या लोकपालकडे तक्रार करा.

इतरांना शेअर करा.......

My name is Umesh Gore. I am a blogger, youtuber and wordpress developer. I have more than 5 years of experience in this field.