नमस्कार मित्रांनो, राज्यातील गरीब आणि गरजू लोकांसाठी राज्य सरकारकडून एक आनंदाची बातमी आहे. राज्यात आता शिंदे सरकारकडून शिधावाटप कार्यक्रम राबविण्यात येत असल्याची आनंदाची बातमी आहे. सरकार स्वतः तुमच्या दारी धान्य वाटप करणार आहे. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारच्या नव्या निर्णयानुसार रेशन घेणाऱ्या नागरिकांना रेशन घेण्यासाठी स्वस्त किराणा दुकानात जाण्याची गरज नाही, आता रांगेत उभे राहण्याची गरज नाही, आता सरकार मोबाईल रेशनद्वारे धान्य वाटप करणार आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे जनतेचा बराच वेळ वाचणार आहे.
Cred App लोन मिळवा फक्त 1 मिनिटात, कुठल्याच कागदपत्रांची गरज नाही
या योजनेची सुरुवात मुंबई आणि ठाणे येथून होईल आणि पात्र लाभार्थ्यांना शासनाकडून धान्य मिळेल, असे निर्देशही अन्न पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले आहेत. मुंबई आणि एमएमआरडीए क्षेत्रातील लाभार्थी जनतेला वेळेवर रेशन मिळावे यासाठी आम्ही ही योजना आणली असून या महिन्यात आम्ही ही योजना येथे राबवू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आता या योजनेमुळे लोकांचा बराच वेळ वाचणार आहे, त्यामुळे आता लोकांना रेशन खरेदीसाठी रेशन दुकानात जावे लागणार नाही, सरकार तुमच्या दारी येईल.