Post Office KVP Scheme : सुरक्षित गुंतवणुकीसाठी प्रसिद्ध असलेल्या पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये आता अशी एक योजना आहे जी फक्त ९ वर्षे ७ महिन्यांत तुमचा निधी दुप्पट करते. ही योजना म्हणजे ‘किसान विकास पत्र’ (KVP). सरकारची हमी, चांगला व्याजदर आणि कोणतीही गुंतवणूक मर्यादा नसलेली ही योजना गुंतवणूकदारांसाठी एक उत्तम पर्याय ठरते.
Table of Contents
केवळ ₹1,000 पासून सुरुवात करता येणारी योजना
KVP योजनेत गुंतवणुकीची सुरुवात अवघ्या 1,000 रुपयांपासून करता येते. यामध्ये गुंतवणुकीवर कोणतीही वरची मर्यादा नाही. म्हणजेच, मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणार्यांनाही ही योजना उपयुक्त आहे.
७.५% चक्रवाढ व्याज – पैसे दुप्पट होण्याची शाश्वती
सध्या या योजनेत 7.5% दराने चक्रवाढ व्याज मिळते. म्हणजेच, दरवर्षी मिळणारे व्याज मूळ रकमेच्या जोडीला लागते आणि पुढील वर्षी त्यावरही व्याज मिळते. यामुळे निधी अधिक वेगाने वाढतो. संपूर्ण मुदत 115 महिन्यांची (9 वर्षे 7 महिने) असून, या काळानंतर गुंतवलेली रक्कम दुप्पट होते.
कोणतीही मर्यादा नाही, एकाहून अधिक खाती शक्य
या योजनेत एक व्यक्ती अनेक खाती उघडू शकते. सिंगल किंवा जॉइंट अकाउंट्स उघडण्याची मुभा आहे. याशिवाय, 10 वर्षांपेक्षा मोठ्या मुलाच्या नावानेही खाते उघडता येते.
कसे काम करते दुप्पट होण्याचे गणित?
समजा एखाद्याने 1 लाख रुपये गुंतवले, तर 7.5% च्या व्याजदराने पहिल्या वर्षी 7,500 रुपये व्याज मिळेल. ही रक्कम मूळ रकमेत मिळून दुसऱ्या वर्षी ती 1,07,500 रुपये होईल. पुढील वर्षी त्यावर व्याज वाढून रक्कम अधिक होईल. अशाप्रकारे चक्रवाढ पद्धतीने वाढ होत जाईल आणि मुदतीच्या शेवटी रक्कम 2 लाख रुपये होईल.
जर कोणी 5 लाख रुपये गुंतवले, तर हीच गणिती पद्धत वापरून 10 लाख रुपये मिळू शकतात. म्हणजेच, धोका न घेता दुप्पट रक्कम मिळवण्याची ही एक सुरक्षित संधी आहे.