PM Viksit Bharat Yojana 2025 : सरकारने कंपन्यांना आणि कामगारांना प्रोत्साहन देण्यासाठी एक मोठं पाऊल उचललं आहे. जर एखाद्या कंपनीने ईपीएफओ (EPFO) नोंदणीकृत असलेल्या नवीन कर्मचाऱ्यांना नोकरीवर घेतलं, तर प्रति पात्र भरतीवर सरकारकडून दरमहा ₹3,000 थेट डीबीटीद्वारे दिले जाणार आहेत!
Table of Contents
📌 कोणाला किती काळ लाभ?
- बहुतेक क्षेत्रांमध्ये: हा लाभ 2 वर्षांपर्यंत लागू.
- उत्पादन (मॅन्युफॅक्चरिंग) क्षेत्रात: 4 वर्षांपर्यंत ही सुविधा लागू.
✅ पात्रता काय आहे?
कंपन्यांसाठी:
- 50 पेक्षा कमी कर्मचाऱ्यांची कंपनी असल्यास – किमान 2 नवीन भरती आवश्यक.
- 50 किंवा अधिक कर्मचाऱ्यांची कंपनी असल्यास – किमान 5 नवीन भरती आवश्यक.
कर्मचाऱ्यांसाठी:
- 15 ऑगस्ट 2025 नंतर EPFO नोंदणीकृत संस्थेत नोकरी स्वीकारलेली असावी.
- मासिक वेतन ₹1 लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे.
- UMANG अॅपद्वारे फेस ऑथेंटिकेशन करून UAN तयार करणे आवश्यक.
- 6 महिने नोकरी टिकविल्यावर पहिला हप्ता आणि 12 महिने पूर्ण करून वित्तीय साक्षरता प्रशिक्षणानंतर दुसरा हप्ता मिळेल.
EPFO चा मोठा निर्णय: आता PF मधून घरासाठी रक्कम काढता येणार
🏢 नियोक्त्यांसाठी गरजेची प्रक्रिया:
- श्रम सुविधा पोर्टलवरून EPFO कोड प्राप्त करावा.
- EPFO Employer Login वर नोंदणी करून PM-VBROY इंटरफेस वापरणे आवश्यक.
- आधार प्रमाणित UAN असलेल्या पात्र कर्मचाऱ्यांची भरती करणे.
- वेळेवर ईसीआर (ECR) सादर करणे आणि पीएफ योगदान भरणे.
- भरती केलेले कर्मचारी किमान 6 महिने टिकवणे आवश्यक.
📥 अर्ज कसा कराल?
कर्मचार्यांसाठी:
- स्वतंत्र अर्जाची गरज नाही.
- जेव्हा पीएफ खाती आधाराशी लिंक केली जातात, तेव्हा पात्रता आपोआप लागू होते.
- सरळ लाभ बँक खात्यात जमा केला जाईल.
नियोक्त्यांसाठी:
- श्रम सुविधा पोर्टलवरून EPFO कोड मिळवावा.
- PM-VBROY इंटरफेसवर लॉगिन करून कर्मचारी भरती व निकष पूर्ण करावेत.
- ईसीआर फाईल करून वेळेवर योगदान द्यावे.
- लाभ दर 6 महिन्यांनी थेट कंपनीच्या PAN लिंक बँक खात्यात जमा होईल.
ही योजना रोजगार वाढीस चालना देण्यासाठी आणि कामगारांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी मोठं पाऊल आहे. जर तुमची कंपनी किंवा तुम्ही स्वतः या निकषांत बसत असाल, तर याचा फायदा घ्यायला अजिबात उशीर करू नका!
इंटरनेट शिवाय मोफत PF बॅलन्स कसा तपासाल? जाणून घ्या EPFO ची मिस्ड कॉल आणि SMS सेवा