Pm Ujjwala Yojana 300 Rupay Cylinder : सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 14.2 किलो एलपीजी सिलेंडर फक्त 300 रुपयांत मिळतो. केंद्र सरकारने यासाठी सबसिडी वाढवली असून, 31 मार्च 2025 पर्यंत ही सवलत लागू आहे.
Table of Contents
उज्वला योजना म्हणजे काय?
2016 साली सुरू झालेली ही योजना गरीब, ग्रामीण आणि वंचित गटातील महिलांना स्वच्छ इंधन – म्हणजेच एलपीजी गॅस – देण्यासाठी सुरू करण्यात आली. यामुळे पारंपरिक चुलीमधील धुरामुळे होणारे आरोग्याचे धोके कमी होतात.
या योजनेत काय मिळतं?
- मोफत गॅस कनेक्शन
- पहिलं रिफिल मोफत
- गॅस चूल
- दर महिन्याला 300 रुपयांची सबसिडी (12 सिलेंडरपर्यंत)
या योजनेसाठी पात्रता काय?
- अर्जदार महिला भारतीय नागरिक असावी
- वय 18 वर्षांपेक्षा अधिक
- गरीबी रेषेखालील कुटुंबातील सदस्य
- आधीपासून गॅस कनेक्शन नसलेलं घर
- SC/ST/OBC, AAY, वनवासी, पीएम आवास लाभार्थी, SECC यादीतील महिलांना प्राधान्य
अर्जासाठी लागणारी कागदपत्रं
- आधार कार्ड
- बीपीएल रेशन कार्ड
- बँक पासबुक
- पत्त्याचा पुरावा
- वयाचा पुरावा
- पासपोर्ट साइज फोटो
- जातीचा दाखला (लागू असल्यास)
महत्त्वाचं: बँक खाते आधारशी लिंक असणं गरजेचं आहे, जेणेकरून सबसिडी थेट खात्यात जमा होईल.
अर्ज कसा करायचा?
ऑनलाईन:
- www.pmuy.gov.in वर जा
- “Apply for New Ujjwala 2.0 Connection” वर क्लिक करा
- गॅस एजन्सी निवडा (इंडेन, भारत, HP)
- फॉर्म भरून सबमिट करा
- प्रिंटआउट घेऊन कागदपत्रांसह जवळच्या गॅस एजन्सीमध्ये जमा करा
ऑफलाइन:
- जवळच्या गॅस वितरकाकडे फॉर्म मिळवा
- तो भरून आवश्यक कागदपत्रांसह जमा करा
- सत्यापनानंतर कनेक्शन मिळेल