PM kisan yojana Update 2024 : PM किसान योजनेचे नवीन नियम.. सविस्तर वाचा


व्हॉट्सॲप ग्रुप           येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा

PM kisan yojana Update 2024 : पीएम किसान योजनेसाठी सरकारने नवीन नियमावली तयार केली आहे. नवीन नियमांमध्ये, 2019 पूर्वी जमीन खरेदी करताना वारसा हक्क वगळता सर्वांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

दरम्यान, आता पीएम किसानसाठी नाव नोंदणी करताना पती/पत्नी आणि मुलांचे आधार कार्ड देखील एकत्र लिंक करावे लागेल.

कुटुंबातील एकालाच लाभ मिळेल.

केंद्र सरकारने 2019 मध्ये शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये 6 हजार रुपये दिले जातात. आता राज्य सरकारने ही योजना सुरू केली आहे.

लाभार्थी शेतकऱ्याला वर्षाला तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये मिळत आहेत. या योजनेत शेतकरी किंवा अठरा वर्षांवरील मुले असलेल्या एकाच कुटुंबातील पती-पत्नीपैकी कोणीही हा लाभ घेऊ शकतात.

2019 पूर्वी उताऱ्यावर नाव नोंदणीकृत असेल किंवा वारसा हक्कात नाव नोंदणीकृत असेल तरच या योजनेचा लाभ मिळेल. मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी पती, पत्नी व मुलगा तसेच 2019 नंतर ज्यांच्या नावावर जमीन झाली आहे आणि माहेरवाशिणी त्यांच्या नावावर जमीन दाखवून दोघांनाही फायदा होत असल्याचे कळते. .

पात्र लाभार्थी शेतकऱ्याचा मृत्यू झाला असेल, तर कुटुंबातील एका व्यक्तीलाच लाभ मिळू शकतो.

आवश्यक कागदपत्र

  1. लाभार्थी शेतकऱ्याचा सातबारा उतारा .
  2. शेतकऱ्याचा आठ अ.
  3. लाभार्थी शेतकऱ्यांच्या पती-पत्नीचे आधार कार्ड.
  4. लाभार्थी शेतकऱ्यांची फेरफार.
  5. विहित नमुना अर्ज.
  6. शिधापत्रिका.
इतरांना शेअर करा.......

My name is Umesh Gore. I am a blogger, youtuber and wordpress developer. I have more than 5 years of experience in this field.