पशुसंवर्धन योजनेत कागदपत्रे अपलोड करताना चूक झाली? सुधारणा करण्यासाठी १ ते ३ जुलैपर्यंत संधी


व्हॉट्सॲप ग्रुप           येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा

Pashusavardhan Vibhag Kadadpatre Upload Update : पशुसंवर्धन विभागामार्फत शेळीपालन, दुधाळ जनावरे वाटप, कुक्कुटपालन, आणि पशुधन व्यवस्थापन यासारख्या विविध योजनांअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान दिलं जातं. या योजनांसाठी ऑनलाइन अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे अपलोड केली आहेत.

काही लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड करताना चुकीची माहिती दिली असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे सूचना पाठवण्यात आल्या आहेत. संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या अर्जामधील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी १ जुलै २०२५ ते ३ जुलै २०२५ या कालावधीत सुधारित कागदपत्रे पुन्हा अपलोड करावी लागणार आहेत.

महत्त्वाच्या तारखा:

  • त्रुटी दुरुस्तीची अंतिम मुदत: १ जुलै ते ३ जुलै २०२५
  • अंतिम कागदपत्र पडताळणी: ४ ते ६ जुलै २०२५
  • अंतिम पात्र लाभार्थी यादी प्रसिद्ध होण्याची तारीख: ७ जुलै २०२५

शेतकऱ्यांनी दिलेल्या वेळेत कागदपत्रे पूर्णपणे अपलोड करून आपला अर्ज पूर्ण करावा, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे. अर्जात त्रुटी असल्यास अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

अधिक माहितीसाठी: https://ah.mahabms.com

इतरांना शेअर करा.......

My name is Umesh Gore. I am a blogger, youtuber and wordpress developer. I have more than 5 years of experience in this field.