मोदी सरकारनंतर आता राज्यातील महाआघाडी सरकारही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करणार आहे. यासाठी सरकारने ‘नमो शेतकरी महा सन्माननिधी’ योजना जाहीर केली होती. या योजनेचे पैसे शेतकऱ्यांना कधी मिळणार याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने जाहीर केलेल्या ‘नमो शेतकरी महा सन्माननिधी’ योजनेचा पहिला हप्ता पात्र शेतकऱ्यांना मिळावा यासाठी सुरू असलेल्या कार्यवाहीचा कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी आढावा घेतला. हा पहिला हप्ता लवकरच वितरित करण्यात येणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले.
येथे झालेल्या आढावा बैठकीत कृषी आयुक्त सुनील चव्हाण, कृषी संचालक दिलीप झेंडे, महाआयटीचे व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज, महाआयटीचे विभागप्रमुख किरण गरग, अमेय सरवणकर, सहसचिव सरिता बांदेकर-देशमुख, श्रेणिक शहा, उपसचिव संतोष कराड, अवर सचिव डॉ. मंत्रालय नीना शिंदे, उपायुक्त दयानंद जाधव यांच्यासह कृषी व माहिती तंत्रज्ञान या दोन्ही विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पीएम किसान लाभार्थी यादीतील नाव पाहण्यासाठी
पावसाळी अधिवेशन 2023-24 च्या पुरवणी मागण्यांमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी 4 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातून योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता वितरित करता येईल. राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
त्यामुळे त्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता त्वरित मिळावा, असेही मुंडे म्हणाले. पीएफएमएस प्रणालीद्वारे निधीचे वितरण थेट शेतकऱ्यांच्या खात्यात होणार असल्याने त्यामध्ये योजनेची नोंदणी करण्यात आली आहे.
ते म्हणाले की, महाआयटी पीएम किसान योजनेप्रमाणे महाडीबीटी पोर्टलवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे मॉड्यूल विकसित करण्यासाठी काम करत आहे.